भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये गुरुवारी (२९ जुलै) तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बलाढ्य भारतीय संघ एकहाती विजय मिळवत मालिका आपल्या नावावर करेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु श्रीलंका संघाने जोरदार प्रत्युत्तर देत या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. यासह ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. परंतु पराभव झाला असला तरीही कर्णधार शिखर धवनने मन जिंकणारे कृत्य केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मालिका जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला श्रीलंका संघाकडून ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामधे तो श्रीलंकेच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे. श्रीलंकेच्या ताफ्यातील शिलेदारही त्याच्याभोवती उभे राहून लक्ष देऊन त्याचे बोलणे ऐकून घेत आहेत.
शिखर धवनने केलेल्या या कृत्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. यापूर्वी धवनप्रमाणे भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल स्पर्धेत अनेकदा युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसून आला आहे.(Shikhar Dhawan heart winning gesture after 2-1 loss agianst srilnaka in T20 series)
Massive respect @SDhawan25 ❤️#SLvIND @OfficialSLC @BCCI pic.twitter.com/0ANy7Mcni3
— Piyum Samuel (@PiyumSamuel) July 29, 2021
भारतीय संघाचा फ्लॉप शो
तसेच सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न होता. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला. भारतीय संघाला २० षटकअखेर अवघ्या ८१ धावा करण्यात यश आले. यामध्ये कुलदीप यादवने सर्वाधिक २३ धावांचे योगदान दिले.
श्रीलंका संघाने २-१ ने मालिका केली नावावर
दुसऱ्या डावात भारताच्या ८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. या संधीचा श्रीलंका संघाने दोन्ही हातांनी स्वीकार केला. धनंजय डी सिल्वाने या सामन्यात सर्वाधिक २३ धावांची खेळी करत श्रीलंका संघाला सामना जिंकून दिला. अशाप्रकारे त्यांनी २-१ च्या फरकाने टी२० मालिकाही आपल्या नावावर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाचा उन्माद! टी२० मालिकेत श्रीलंकेचा टीम धवनला धोबीपछाड, जल्लोषात हसरंगाचे लाजिरवाणे कृत्य
वयाच्या तिशीत वॉरियरच्या डोक्यावर सजली ‘पदार्पणाची कॅप’; आनंदाने झाला भावूक, फुटलं रडू
कमालच! श्रीलंका दौऱ्यात वनडे अन् टी२० पदार्पण केलेल्या खेळाडूंचा तयार होऊ शकतो आख्खा एक भारतीय संघ