---Advertisement---

कर्णधार धवनसह ‘हे’ सात खेळाडू भारतात परतलेच नाही, ‘असा’ आहे संघाचा पुढचा प्लॅन

On: बुधवार, नोव्हेंबर 30, 2022 11:19 PM
Shikhar Dhawan still in NZ
---Advertisement---

भारतीय संघ गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) बांगलादेश दौऱ्यासाठी ढाका येथे पोहचणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि जे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग नव्हते हे सर्व खेळाडू गुरुवारी ढाका येथे पोहचतील. मात्र, शिखर धवन समवेत बरेच खेळाडू यावेळी न्यूझीलंडमध्ये आहेत, ते सर्व शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) भारतीय संघासोबत असतील. भारत आणि बांगलादेश संघ 4 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यामध्ये समोरासमोर असतील.

भारतीय संघाचा एकदिवसीय मालिकेच्या पराभवाने न्यूझीलंड दौऱ्याचा शेवट झाला. भारताचा बांगलादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र, भारतीय संघाचे काही खेळाडू अजूनही न्यूझीलंडमध्ये आहेत. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) बरोबरच श्रेयस अय्यर(Shreyas Iyer), रिषभ पंत (Rishabh Pant), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar ), शार्दुल ठाकुर (Shardul Thakur), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि दीपक चहर (Deepak Chahar)हे खेळाडू सध्या न्यूझीलंडमध्ये आहेत, जे शुक्रवारी भारतीय संघात सामील होतील.

या दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने तर तीन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात आधी एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल आणि नंतर कसोटी मालिकेची सुरुवात करण्यात येईल. हे तीन एकदिवसीय सामने 4 डिसेंबर, 7 डिसेंबर आणि 11 डिसेंबरला खेळवले जातील. त्याचबरोबर 14 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला दोन कसोटी सामने सुरु होतील. बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. भारतीय संघात वरीष्ठ खेळाडूंचा देखील समावेश आहेे. बांगलादेश संघाचे नेतृत्व तमिम इकबाल याच्याकडे सोपवण्यात आले असून यजमान संघाने आपल्या कसोटी संघाची निवड अजून केलेली नाही.

भारताचा न्यूझीलंड दौरा बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) संपला. भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय आणि टी20 सामन्यात किवी संघाचा सामना केला. ज्यात शिखर धवन याच्याा नेतृत्वाखाली तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0ने पाराबव स्वीकारावा लागला. तसेच टी20 मालिकेत हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1-0ने विजय मिळवला होता.

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ
एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाझ अहमद, इशान किशन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.

कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएल राहुल, रिषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मालिका गमावली पण श्रेयस-गिलला झाला क्रमवारीत जबरदस्त फायदा
‘एवढ्या लवकर तुलना कशी करू शकता…’, हर्षा भोगलेंना रिषभ पंतचे प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---