भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवननं (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवननं शनिवारी (24 ऑगस्ट) सकाळी क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आणि अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. धवन बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. धवनची भारतासाठी चांगली कारकीर्द राहिली. त्यानं भारतीय संघासाठी केवळ भारतातच नाही तर बाहेरच्या देशातही खूप धावा केल्या. त्याच्या नावावर असा रेकाॅर्ड आहे, जो कोणताही भारतीय सलामीवीर मोडू शकला नाही.
शिखर धवन (Shikhar Dhawan) हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव सलामीवीर आहे, ज्यानं यजमान देशांमध्ये म्हणजेच दक्षिण आफ्रीका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामन्यात शतकं झळकावली. त्याच्या बॅटमधून यजमान देशात खूप धावा निघत होत्या. धवन व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय सलामीवीराला यजमान देशात शतक झळकावता आलं नाही.
धवननं दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर शतक झळकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या अवघड खेळपट्टीवर त्यानं धमाकेदार फलंदाजी करत शानदार शतक झळकावलं होतं. त्यानं न्यूझीलंडच्या मैदानावर देखील शतक झळकावलं होतं. धवनला इंग्लंडवर विशेष प्रेम होतं. येथे धवनला फलंदाजी करणं खूप आवडत होतं. धवननं इंग्लंडच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये कहर केला असून तिथं 4 शतकं झळकावली आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर देखील धवननं कहर करत 2 धमाकेदार शतकं झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘या’ स्टार खेळाडूनं झळकावलं शानदार शतक
6,6,6,6….निकोलस पूरनचा कहर! षटकारांच्या बाबतीत सूर्या, बटलरला मागे टाकलं
आफ्रिदी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, शाहिनच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म