सलामीवीर शिखर धवने हॉंगकॉंग विरुध्दच्या सामन्यात 120 चेंडूत 127 धावांची खेळी केली. आपल्या या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार 2 षटकार लगावले. त्याने अंबाती रायडू सोबत 116 धावांची भागीदारी केली. अंबाती रायडूने 60 धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय इतर खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. शिखरने या सामन्यात शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
शिखर धवनने आपल्या नावावर केले हे विक्रम:
# भारतासाठी वनडेत सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर धवन युवराज सिंगसह संयुक्तपणे 6 स्थानावर आहे. भारतासाठी वनडेत सर्वाधिक शतक करणारे खेळाडू.
सचिन तेंडुलकर- 49
विराट कोहली- 35
सौरव गांगुली -22
रोहित शर्मा -18
वीरेंद्र सेहवाग-15
शिखर धवन -14 युवराज सिंग – 14
# खालील 8 देशातील क्रिकेटच्या मैदानावर शिखर धवनने शतके ठोकली आहेत.
भारत -4
इंग्लड -3
आँस्ट्रेलिया -2
न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, झिम्बॉबे, युएई येथे प्रत्येकी 1
# सर्वात कमी डावात 14 शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर धवन चौथ्या स्थानी. त्याने 105 डावात ही कामगिरी केली आहे.
हाशिम आमला- 83
डेव्हीड वॉर्नर – 98
विराट कोहली -103
शिखर धवन- 105
एबी डिव्हीलीर्स-131
# डावखुऱ्या भारतीय फलंदाजांच्या शतकांच्या यादीत शिखर धवन आता सयुंक्तपणे युवराज सिंग सोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सौरव गांगुली -22
शिखर धवन आणि युवराज सिंग – 14
गौतम गंभीर -11
# वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय सलामीवीर फलंदाजांच्या यादीत शिखर धवन विरेंद्र सेहवागसह चौथ्या स्थानी.
सचिन तेंडुलकर – 45
सौरव गांगुली -19
रोहित शर्मा -16
शिखर धवन आणि वीरेंद्र सेहवाग -14
# संयुक्त अरब अमिरातीमध्ये सचिन तेंडुलकरनंतर शतक करणारा शिखर पहिला भारतीय फलंदाज. सचिनने 18 वर्षांपूर्वी 20 आँक्टोबर 2000 ला श्रीलंकेविरुद्ध शारजाला केले होते शतक. सचिन तेंडुलकरपूर्वी 5 भारतीय फलंदाजांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये शतके केली आहे.
# हाँग काँग विरुद्ध वनडेत शतक करणारा शिखर तिसरा भारतीय फलंदाज. याआधी एमएस धोनी आणि सुरेश रैनाने केला आहे हा पराक्रम.
महत्त्वाच्या बातम्या-
–एशिया कप २०१८: केवळ 16 तासात टीम इंडिया खेळणार दुसरा आंतरराष्ट्रीय सामना
–एशिया कप २०१८: भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानला सुरुवातीलाच दिले दोन धक्के