भारतात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवणे फार कठीण असते. त्याहूनही जास्त कठीण गोष्ट असते, भारतीय संघातील जागा टिकवून ठेवणे. भारतीय संघात जितकी स्पर्धा आहे, तितकीच संघाबाहेरही आहे. परंतु भारतीय संघात एक असा खेळाडू आहे, ज्याची क्रिकेट कारकीर्द कर्णधार रोहित शर्मा याच्यामुळे उद्ध्वस्त होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हा खेळाडू रोहितचा चांगला मित्रही आहे.
रोहित (Rohit Sharma) भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर शानदार कामगिरी करत आहे. परंतु तो कर्णधार बनल्यामुळे त्याच्या एका जिगरी मित्राची (Rohit Sharma’s Friend) कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली आहे. ‘गब्बर’ नावाने ओळखला जाणारा शिखर धवन (Shikhar Dhawan) हाच तो खेळाडू आहे.
धवनसाठी रोहित ठरला धोक्याची घंटा
धवनला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. परंतु आता कर्णधार रोहित त्याच्या कारकिर्दीत अडथळा (Rohit Threats To Dhawan’s Test Career) बनत आहे. कारण रोहित हा एक सलामीवीर (Indian Test Team Opener) फलंदाज आहे. कर्णधार बनल्यापासून त्याचे संघातील सलामीचे स्थान निश्चित झाले आहे. तसेच त्याच्यासोबत दुसरा सलामी जोडीदार म्हणून केएल राहुल किंवा मयंक अगरवाल यांना संधी दिली जात आहे. याचमुळे धवनसाठी भारतीय संघाची दारे कायमची बंद होऊ शकतात.
एकेकाळी भारतीय संघाचा मॅच विनर म्हणवला जाणाऱ्या धवनला आता कसोटी संघात जागाही मिळत नाहीय. त्याच्यापेक्षा जास्त संधी राहुल आणि अगरवालला दिल्या जात आहेत. धवन २०१८ पासून भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. तेव्हापासून त्याला प्लेइंग इलेव्हन सोडाच, एखाद्या मालिकेसाठी पूर्ण संघातही निवडले जात नाहीय. अशात त्याचे कसोटी संघात परतणे जवळपास अशक्य आहे.
शिखर धवनची कसोटी कारकिर्द
धवनच्या कसोटी कारकिर्दीवर (Shikhar Dhawan’s Test Career) नजर टाकायची झाल्यास, त्याने २०१३ ते २०१८ दरम्यान ३४ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान ४० च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने २३१५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ७ शतके आणि ५ अर्धशतके ठोकली आहेत.
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! आयपीएलच्या ‘या’ विक्रमात धोनीच अव्वल, पोलार्ड अन् डिविलियर्सलाही पछाडलं
CWC22| वेस्ट इंडिजचा पुन्हा एकदा रोमांचक विजय, बांगलादेशला शेवटच्या षटकात चारली पराभवाची धूळ
आयपीएल २०२२पूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला धक्का, ७.५० कोटींचा घातक गोलदाज पूर्ण हंगामातून बाहेर