---Advertisement---

“सात समुंदर पार मै तेरे…” भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये वाजले गाणे आणि धवन, शॉचे थिरकले पाय

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 8:51 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ दुबईमार्गे सिडनी येथे दाखल झाला होता. आता भारतीय संघाने इनडोअर स्टेडियममध्ये सरावाला सुरुवात केली आहे. सरावासोबतच भारतीय संघातील खेळाडू मौजमजा करताना दिसत आहेत. भारतीय संघाचे दोन सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे सरावादरम्यान हिंदी गाण्यांचा आनंद घेताना दिसून आले.

सात समुंदर पार मै तेरे…

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सरावावेळी मस्ती करत होते. हिंदी सिनेमातील प्रसिद्ध गाणे ‘सात समुंदर पार मैं तेरे…’ या गाण्यावर दोघेही थिरकताना दिसले. पृथ्वी पुढेपुढे चालत असताना, शिखर त्याच्यामागे शर्ट काढून चालताना दिसत आहे. शिखरने आपल्या इंस्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर करताना; कॅप्शन लिहिले आहे की, ‘लैलाने मला अजून वेडे केले आहे.’

या दोघांचा हा व्हिडिओ सध्‍या तुफान व्हायरल होत आहे. भारतीय संघातील बरेचसे खेळाडू सोशल मीडियावर सातत्याने व्यस्त असतात. त्यामुळे, ड्रेसिंग रूम आणि सरावा दरम्यानचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर येत असतात.

https://www.instagram.com/p/CHuEKf7D8Y2/?utm_source=ig_web_copy_link

आयपीएल वेळी ‘लैला में लैला’ गाण्यावर केले होते नृत्य

आयपीएल २०२० वेळी देखील शिखर आणि पृथ्वी यांचा ‘लैला मैं लैला’ या गाण्यावरील नृत्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावेळी देखील चाहत्यांनी या व्हिडिओला पसंत केले होते. आयपीएलमध्ये शिखर आणि पृथ्वी दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत होते. शिखर आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दुसरीकडे, पृथ्वीसाठी ही आयपीएल विसरण्यासारखे राहिली. सातत्याने अपयशी ठरल्याने, त्याला अखेरच्या काही सामन्यातून वगळण्यात आले होते.

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबर पासून होणार आहे. सर्वात आधी तीन सामन्यांची वनडे मालिका, त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका व अखेरीस चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

मेलबर्न स्टार्सकडून खेळणार झहीर खान; हसीने केले स्वागत

ऍडलेडमध्ये कोविड-१९ ची दुसरी लाट; ‘या’ स्टेडियमवर हलवली जावू शकते भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी

बाबर आझम की विराट कोहली? पाकिस्तान सुपर लीगनंतर चाहत्यांनी केली तुलना

ट्रेंडिंग लेख –

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---