भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवन सध्या संघातून बाहेर आहे. धवन मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा नियमित भाग नाहीये. आगामी आशियाई गेम्समध्ये भारताच्या युवा संघाचे नेतृत्व धवनकडे असेल, असा अंदाज अनेकांचा होता. मात्र, संघ व्यवस्थापानाने धवनला आशियाई गेम्समधूनही वगळले. स्वतः धवनसाठीही ही गोष्ट धक्कादायक होती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिखर धवन (Shikhar Dhawan) याबाबत बोलला. धवनच्या मते ते आशियाई गेम्ससाठी त्याची संघात निवड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी त्याच्या डागील ऋतुराज गायकवाड याला आशियाई गेम्समध्ये संघाचा कर्णधार बनवले. याविषयी शिखर धवन म्हणाला, “आशियाई गेम्ससाठी माझे नाव संघात नाही, हे पाहून मला धक्का बसला होता. पण नंतर मला अशे वाटले की, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळी मी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. ऋतुराज गायकवाड या संघाचे नेतृत्व करत आहे, याचा आनंद वाटतो. संघातील सर्वजण युवा असून चांगले प्रदर्शन करतील, असा विश्वास आहे.”
यावर्षीचा विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. आगामी आशियाई गेम्स 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान खेळल्या जाणार आहेत. वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार असून त्याआधी भारताला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. शिखर धवनच्या मते रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे प्रदर्शन विश्वचषकादरम्यान पाहण्यासारके असले. याआधी 2019 वनडे विश्वचषकात देखील रोहितचे प्रदर्शन चमकदार राहिली होते. “विश्वचषकादरम्यान रोहित शर्मावर लक्ष असेल. कारण 2019 विश्वचषकात त्याचने चांगली कामगिरी केली होती,” असेही धवन यावेळी म्हणाला.
एशियन गेम्ससाठी भारतीय संघ-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग.
दरम्यान, शिखर धवन याने भारतासाठी शेवटचा सामना डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. 2023मध्ये अद्याप एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाहीये. यावर्षीची वनडे विश्वचषक भारतातील 10 वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळला जाणार असून बीसीसीआय यासाठी तयारी करत आहे. (Shikhar Dhawan reacts to not being selected in the squad for the Asian Games 2023)
महत्वाच्या बातम्या –
युवा फलंदाजाचा अश्विन आणि वसीम जाफरवर प्रभाव, दिग्गजांची विश्वचषकासाठी थेट निवडकर्त्यांकडे मागणी
मोठी बातमी! विश्वचषक तोंडावर असताना ईडन गार्डनला आग, ड्रेसिंग रुम जळून खाक