भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करतोय. मात्र, त्याचा पंजाब किंग्स संघ प्ले ऑफ्सच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेत त्याला कर्णधार बनविण्यात येणार असल्याच्या बातम्या देखील येत आहेत. त्याच वेळी आता शिखर धवनकडून आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते. माध्यमांतील वृत्तानुसार, शिखर लवकरच एका चित्रपटात अभिनय करताना दिसून येईल. त्याची ही भूमिका कॅमिओ नसून, मुख्य भूमिकांपैकी एक आहे.
काही आघाडीच्या वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर लवकरच आपला फिल्म डेब्यू करणार आहे. त्याने आधीच चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे. मात्र, चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नाही. त्याच्या काही जवळच्या व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे, शिखर कलाकारांची खूप इज्जत करतो. जेव्हा त्याला या चित्रपटासाठी विचारले तेव्हा त्याने तात्काळ होकार दिला. तसेच, चित्रपटाच्या दिग्दर्शकांना देखील त्या भूमिकेसाठी शिखरसारखंच व्यक्तिमत्व हव होतं. त्याची भूमिका मुख्य अभिनेत्यांची नसली तरी, महत्त्वाची असणार आहे. इतर क्रिकेटपटूंसारखा हा कॅमिओ नसेल.
अनेक अभिनेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध
शिखर धवन आपल्या खुशमिजाज अंदाजासाठी ओळखला जातो. त्याचे अनेक बॉलीवूड अभिनेत्यांश मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे प्रसिद्ध अभिनेते त्याला भावाप्रमाणे मानतात. त्यांच्यासोबतचे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
रामसेतू सिनेमाच्या सेटवर दिसला होता शिखर
अक्षय कुमारचा बहुचर्चित रामसेतू चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमारसोबत शिखरला पाहिले गेले होते. मात्र, शिखर अभिनय करत असलेला हा चित्रपट नाही. शिखर इंस्टाग्रामवर रील्स बनवून आपले अभिनय कौशल्य दाखवत असतो.
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेविरूद्धच्या सामन्याआधी राजस्थानच्या गोटात आनंदीआनंद; दुसऱ्या स्थानासाठी दावेदारी मजबूत
फक्त १० सामन्यांत चहल मोडणार विराटचा ९७३ आयपीएल धावांचा विक्रम? पाहा नक्की काय आहे प्रकरण
इंडिया टूरसाठी दक्षिण आफ्रिका टी२० संघाची घोषणा; बेबी एबी बाहेर पण दुसरा मुंबईकर…