मागील अनेक वर्षांपासून शिखर धवन आणि रोहित शर्माने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीला फलंदाजी केली आहे. त्यामुळे हे दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. या मैत्रीबद्दल बोलताना शिखरने 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुखापत झाल्यानंतर शतक करण्यात रोहितने केलेल्या मदतीचा खूलासा केला आहे.
इंडिया टीव्ही चॅनेलवरील ‘आप कि आदालत’ कार्यक्रमात बोलताना शिखर म्हणाला, ‘मला जेव्हा विश्वचषकात दुखापत झाली तेव्हा मी रोहितला म्हणालो, मी मोठे फटके खेळू शतक नाही. आपण चांगली सुरुवात दिली आहे आणि मला वाटते मी परत जायला हवे त्यामुळे पुढचा फलंदाज येऊन खेळू शकेल.’
‘पण धावा जमत असल्याने रोहितने मला थांबण्याचा आग्रह केला. त्याने मला सांगितले की आपली भागीदारी चांगली होत आहे आणि त्यामुळे संघाला मदत होईल.’
‘आणि खरंच आम्ही माझा अंगठा फ्रॅक्चर असतानाही चांगली भागीदारी रचली. रोहित बाद झाल्यानंतर मी फलंदाजीची जबाबदारी सांभाळली. मी वेदना होत असल्याने पेनकिलर्स(वेदना कमी करणारे औषध) घेतले होते. त्यानंतर मी शतक केले.’
‘त्यामुळे रोहितचा माझ्या शतकामध्ये मोठा वाटा आहे. त्याच्या शब्दांनी मला ती खेळी करताना मोठी मदत झाली.’
शिखरला 2019 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध फलंदाजी करताना अंगठ्याला चेंडू लागला होता. पण असे असतानाही शिखरने फलंदाजी करणे कायम करत 117 धावांची शतकी खेळी केली होती. हा सामना भारताने 36 धावांनी जिंकला होता. या सामन्यानंतर मात्र शिखरला अंगठा फ्रॅक्चर झाल्याने उर्वरित 2019 विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
– दबंग दिल्लीच्या नवीन एक्सप्रेसला मेगाब्लॉक नाही…
–चहल म्हणाला, तेव्हा धोनीला बाद झालेले पाहून अश्रू थांबवता येत नव्हते
–…म्हणून श्रीसंत करतो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा तिरस्कार