---Advertisement---

दुखापतग्रस्त शिखर धवन ऐवजी या खेळाडूची झाली टीम इंडियात निवड

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2019 12:48 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. पण या मालिका सुरु होण्याआधीच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.

धवन दुखापतीमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी आता टी20 मालिकेसाठी भारतीय संघात युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

धवनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध सुरतमध्ये खेळत असताना डाव्या गुडघ्यावर खोल जखम झाली आहे. त्याच्या या दुखापतीचा आढावा बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने मंगळवारी घेतला आहे. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने धवनची जखम बरी होण्यास अजून काही काळ लागेल, असे सुचवले आहे.

धवन ऐवजी भारताच्या टी20 संघात निवड झालेला सॅमसन याआधीही बांगलादेश विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. मात्र त्याला या मालिकेतील एकाही सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. सॅमसनने याआधी भारतीय संघाकडून केवळ एक टी20 सामना खेळला आहे. त्याने हा सामना 19 जुलै 2015 ला झिम्बाब्वे विरुद्ध खेळला होता.

वेस्ट इंडीज विरुद्ध टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन.

वृद्धिमान साहावर झाली शस्त्रक्रिया –

नुकत्याच कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाच्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाला(अनामिका) फ्रॅक्चर झाले आहे.

बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने हात आणि मनगट तज्ञाशी सल्लामसलत केली असून त्यांनी साहाला शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सुचवले. त्यानंतर, मंगळवारी त्यांच्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे आणि लवकरच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरु येथे सराव सुरु करेल, असे बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---