भारत आणि बांगलादेश या संघात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 271 धावा केल्या. बांगलादेश संघासाठी मेहेदी हसन याने शतकीय डाव खेळला. मात्र, बांगलादेशच्या या डावात अशा एक घटना घडली, ज्यामुळे प्रेक्षक स्तब्ध झाले. क्रिकेटच्या सामन्यात सामान्यपणे हातांनी झेल पकडला जातो, पण भारताच्या शिखर धवन याने एका विचित्र पद्धतीने झेल घेतला. त्याच्या या झेल घेण्य़ाच्या पद्धतीमुळे प्रेक्षक देखील हैराण झाले. आता त्याचा हा झेल घेतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
बांगलादेश संघाचा फलंदाजी सुरू असताना 17व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) गोलंदाजीसाठी आला. सुंदरने यष्टींच्या रेषेत एक लेंथ चेंडू टाकला ज्यावर फलंदाज शाकिब अल हसन याने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून हवेत गेला. शिखर धवन झेल घेण्यासाठी धावत पुढे आला, पण झेल घेताना चेंडू त्याच्या हातातून सटकला आणि त्याच्या मांड्यांमध्ये येऊन अडकला.
हा झेल पाहण्यासाठी सुंदरने जमीनीवर झोपून घेतले आणि शेवटपर्यंत चेंडूवर आपली नजर टीकवून ठेवली. त्याला वाटत होते की धवन आणि सिराज झेल घेण्याच्या प्रयत्नात एकमेकांना धडकू नये. मात्र, धवनने शेवटपर्यंत चेंडू आपल्या मांडीत अडकवून ठेवला. त्याचा हा झेल पाहून सुंदरला हसू आवरले नाही. शिखर धवन याने हा झेल पकडल्यानंतर मुश्फिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याचा देखील झेल पकडला. अशा पद्धतीने भारतीय संघाला तिसरी विकेटही मिळाली.
भारत आणि बांगलादेश या संघात ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला गेला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकूण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाने निर्धारीत 50 षटकात 271 धावा केल्या. बांगलादेश संघासाठी मेहेदी हसन (Mehidy Hasan) याने झंझावती शतक झळकावत 100 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारीत 50 षटकात 266 धावा करु शकला.(Shikhar Dhawan took catch by using his thighs and the video gone viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाहत्यांना फक्त कारण पाहिजे ! टी20मध्ये मैदान गाजवणाऱ्या विराटला, वनडेतील कामगिरीमुळे केलं ट्रोल
दीपक हुड्डाने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी! रोहितनंतर संघातील दुसरा खेळाडू दुखापतग्रस्त