बुधवारी (दि. 17 मे) आयपीएल 2023चा 64वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता पंजाबचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. या पराभवानंतर बोलताना पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने स्वतः जबाबदारी घेतली.
पंजाबला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना तसेच पुढील सामना जिंकणे अनिवार्य होते . मात्र, मोठी धावसंख्या पार करत असताना त्यांना विजयी रेषेपलीकडे जाण्यात अपयश आले. त्यानंतर बोलताना पंजाबचा कर्णधार शिखर धवन म्हणाला,
“हे निराशाजनक होते. पहिल्या सहा षटकातच आम्ही खरोखर चांगली गोलंदाजी केली नाही. चेंडू स्विंग होत असतानाही आम्ही बळी घेण्यात अपयशी ठरलो. लिव्हिंगस्टोनने शानदार खेळी केली. नो बॉल नंतर आमच्या अपेक्षा वाढल्या होत्या. दुर्दैवाने आम्ही विजय संघ म्हणून सामना समाप्त करू शकलो नाही. शेवटच्या षटकात फिरकी गोलंदाजी देण्याचा माझा निर्णय चुकीचा ठरला. त्यामुळे दिल्ली संघाला लय सापडली. आता अखेरचा सामना जिंकण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू.”
पंजाबसाठी अखेरचे षटक हरप्रीत ब्रार या फिरकीपटूला देण्याचा निर्णय पंजाबच्या चांगलाच अंगलट आला. रायली रुसो याने त्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर एक चौकार व दोन षटकार ठोकले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर फील सॉल्ट याने देखील चौकार मारत, षटकात 23 धावा वसूल केल्या. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याची दोन षटके शिल्लक असताना हरप्रीत याला गोलंदाजी दिल्याने शिखरवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
(Shikhar Dhawan Took Responsibility Of Punjab Kings Defeat Said After Lost Against Delhi Capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Breaking : 5 वर्षांनंतर घडला मोठा विक्रम! खलील अहमदने करून दाखवली भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! हवेत झेप घेत एका कॅप्टनने पकडला दुसऱ्या कॅप्टनचा कॅच, पाहा व्हिडिओ