दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या क्वालिफायर 2 च्या सामन्यात शिखर धवन 78 धावांवर पायचीत झाला होता. मात्र, नाबाद असूनही त्याला बाद करण्यात आले होते. अशा परिस्थितीत रिव्ह्यू हातात असूनही तो वापरायचे विसरला. धवनने असे का केले? म्हणून युवराजने त्याला ट्विट करीत ट्रोल केले आहे.
शिखर धवन फलंदाजी करीत असताना 19व्या षटकात संदीप शर्माने फेकलेला चेंडू सरळ येऊन धवनच्या पॅडवर लागला आणि त्याला बाद घोषित करण्यात आले. हा चेंडू स्टंपला सोडून बाहेरून जात होता. परंतु शिखर धवन रिव्ह्यू न घेताच मैदानाबाहेर पडला.
भारताचा माजी फलंदाज सिक्सर किंग युवराज सिंग हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या सामन्यातून कोणत्या ना कोणत्या खेळाडूला सतत ट्रोल करीत असतो. शिखर धवनबद्दल ट्विट करत त्याने ‘जट्ट जी’ म्हणत चिडवले आहे. त्याने ट्विटच्या सुरुवातीला हैदराबादच्या गोलंदाजांचे विशेषतः नटराजन आणि संदीपचे कौतुक केले. सोबतच त्याखाली धवनवर हास्यास्पद लिखाण केले. तो म्हणाला की, “जट्ट जी डीआरएस घ्यायला विसरलात का?”
Great come back by bowlers in the last 2 overs ! Not even A single boundary scored hats off natrajan and @sandeep25a pressure game execution to the point ! @SDhawan25 man in form but naam to jatt ji hai 🤪 how bout drs bro ? 🤷♂️🤦🏻♂️ as usual must have forgotten 😂 game on #DCvSRH
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) November 8, 2020
या ट्विटमध्ये युवराजने धवनला रिव्ह्यू घ्यायला विसरला असेही म्हटले आहे. या ट्विटवर धवनने देखील आपली प्रतिक्रिया देत म्हटले की, “मला वाटले मी बाद आहे. पण सीमारेषेवर आल्यावर रिप्लायमध्ये समजले की नाबाद होतो.”
Hahahah pajhi mainu lag gya plumb hai tah muuh chuk chal paya jadh boundary tey pahuncha tadh pata lag gya 🤣🤣🤣🤣🤣
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 9, 2020
शिखर धवनने रिव्ह्यू वापरला असता, तर कदाचित त्याने आणखी एक शतकही पूर्ण केले असते. शिवाय दिल्लीच्या संघाने 200 धावांचा टप्पा पार केला असता. धवनने या हंगामात आतापर्यंत 603 धावा केल्या असून ऑरेंज कॅप पासून तो 68 धावा दूर आहे. मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अंतिम सामन्यात तो या कॅपदेखील मिळवण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा