भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवन इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये नेहमीच उत्कृष्ट प्रदर्शन करत आला आहे. धवन त्या मोजक्या खेळाडूमध्ये गणला जातो, ज्यांना आयपीएलमध्ये ६००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, आयपीएल २०२२मध्ये देखील धवन त्याच्या याच चितपरिचित शैलीमध्ये फलंदाजी करत आहे. धवन आता सर्वाधिक आयपीएल हंगामांमध्ये ३०० पेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
मंगळवारी (३ मे) मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला, जो पंजाबने जिंकला. पंजाब किंग्ज या सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला. पंजाबचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने या सामन्यात नाबाद ६२ धावा कुटल्या आणि हंगामातील स्वतःच्या ३०० धावा पूर्ण केल्या. दरम्यान, धवनसाठी हा त्याचा १३वा आयपीएल हंगाम आहे, ज्यामध्ये त्याने ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ३०० धावांचा टप्पा पार करणाऱ्यांमध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. आता रोहित आणि धवन संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आहेत, दोघांनी १३ आयपीएल हंगामांमध्ये वौयक्तिक ३०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर यादीत विराट कोहली आणि सुरेश रैनाचे नाव येते, ज्यांनी प्रत्येकी १२ आयपीएल हंगामांमध्ये ही कामगिरी केली आहे.
दरम्यान, उभय संघात मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम फलंदाजी केली. गुजरात टायटन्सने मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १४४ धावांचे हे लक्ष्य १६ षटकांमध्ये आणि अवघ्या २ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
सर्वाधिक आयपीएल हंगामांमध्ये ३०० पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू
१३ वेळा- शिखर धवन*
१३ वेळा- रोहित शर्मा
१२ वेळा- विराट कोहली
१२ वेळा- सुरेश रैना
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातच्या ‘टायटन्स’वर भारी पडले पंजाबचे ‘किंग्स’, ८ विकेट्सने टेबल टॉपरला चारली धूळ
टीम इंडियातून ५ वर्षे बाहेर होता सॅमसन, वैतागून आवडती बॅट तोडल्यानंतर आलेला क्रिकेट सोडण्याचा विचार