आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) नुकताच पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले तर अनेकांवर मोठ्य बोल्या लागल्या. या लिलावात प्रीती झिंटाच्या पंजाब संघाने यावेळी चांगला संघ तयार केल्याने त्यांचे सर्वच फ्रँचायझीकडून कौतुक होत आहे. आता पंजाब संघासमोर कर्णधारपदाचा मोठा प्रश्न आहे. मयंक अगरवाल (mayank agrawal) कर्णधार होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना एक अहवालसमोर आला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे (shikhar dhawan) संघाचे कर्णधारपद सोपवले जाणे जवळपास निश्चित आहे.
केएल राहुल हा मागील दोन हंगामात पंजाब किंग्सचे नेतृत्व करत होता. परंतु त्याला या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पंजाब संघाने मागच्या हंगामानंतर मयंक अगरवाल आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संघात कायम ठेवले होते. फ्रँचायझी आणि संघ व्यवस्थापनाला मयंकला कर्णधार बनवण्याबाबत खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी लिलावापूर्वी कर्णधारपदाची घोषणा केली नाही. पण धवनच्या आगमनाने संघाला कर्णधारपदासाठी एक चांगला पर्याय मिळाला आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, पंजाब किंग्स धवनला कर्णधार बनवण्यास तयार आहे आणि काही दिवसांत अधिकृत घोषणा केली जाईल. अहवालात लिहले आहे की, “शिखर धवनला संघात घेतल्याने संघ खूप आनंदी आहे. धवन खूपच परिपक्व आहे आणि त्याला आयपीएलमध्ये पंजाबचे नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल. प्रशिक्षक, मालक आणि इतर सर्वजण धवनला पंजाब किंग्सचा कर्णधार बनवण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत. काही दिवसांत अधिकृत घोषणा केली जाईल.”
शिखर धवनला दिल्ली कॅपिटल्स संघाने सोडले होते. त्यानंतर पंजाबने मेगा लिलावात सर्वाधिक ८.२५ कोटी रुपयांची बोली लावून अनुभवी भारतीय सलामीवीर विकत घेतला. धवनला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा थोडाफार अनुभव आहे. त्याने काही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळली होती. याशिवाय त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व केले आहे.
धवन मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९२ समाने खेळले असुन ३४.६३ च्या सरासरीने ५७८४ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वात जास्त ६५४ चौकार लगावणारा खेळाडू आहे
महत्वाच्या बातम्या-