वेस्ट इंडिज दौऱ्यातील भारतीय संघाचा वनडे मालिकेतील कर्णधार शिखर धवनच्या धडाकेबाज फलंदाजीचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याने या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात ९७ धावांची खेळी केल्याने आजीमाजी खेळाडूंनीही त्याचे कौतुक केले आहे. त्यातच भारताच्या दिग्गजाने त्याचा वनडेतील फॉर्म पाहता पुढच्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी निवडकर्ते त्याला संधी देतील, असे विधान केले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी शिखर धवन (Shikhar Dhawan) बाबत हे मोठे विधान केले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत धवन भारतीय संघाचा कर्णधार झाला आहे. त्याने या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. इंडिया न्यूजशी बोलताना शर्मा म्हणाले, “वनडेमध्ये धवनची कामगिरी उत्तम आहे. त्याची आकडेवारी पाहिली असता तुम्हाला कळेल की तो किती चांगला खेळाडू आहे. माझ्या मते, संघनिवड अधिकाऱ्यांनी वनडे विश्वचषकासाठी त्याचा विचार करावा कारण संघाला अशाच धडाकेबाज फलंदाजांची आवश्यकता आहे.”
“शिखर रोहितसोबत सलामीला येतो तेव्हा खेळामध्ये एक स्थिरता असते. त्यातच डाव्या-उजव्या हाताचे कॉम्बिनेशन अप्रतिम ठरते. खेळपट्टीवर या दोन्ही खेळाडूंमध्ये समतोलही दिसला आहे, “असेही शर्मा यांनी पुढे म्हटले आहे.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलामीला सर्वाधिक धावा करण्यामध्ये रोहित-धवन जोडी चौथ्या क्रमांकावर आहे. दोघांनी २०१३-२०२२ दरम्यान ११४ डाव खेळताना ४५.७५च्या सरासरीने ५१२५ धावा केल्या आहेत. त्यातील २१० ही भागीदारी सर्वोत्तम ठरली आहेत. यामध्ये १८ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच मागील वर्षीची आकडेवारी पाहिली तर धवन हा वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच तो त्या दोन खेळाडूंपैकी एक आहे ज्याने मागील वर्षी सर्वाधिक वनडे सामने खेळले होते. यावर्षीच्या श्रीलंका दौऱ्यातही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
धवनने २०२१मध्ये ६ वनडे सामन्यात ५९.४०च्या सरासरीने २९७ धावा केल्या. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१०मध्ये वनडे पदार्पण करताना त्याने आतापर्यंत १५३ सामने खेळले आहेत त्यामध्ये ४५.५४च्या सरासरीने ६४२२ धावा केल्या आहेत. त्यात १७ शतके आणि ३६ अर्धशतके केली आहेत.
आयसीसी वनडे विश्वचषक पुढच्या वर्षी म्हणजे २०२३मध्ये भारतात खेळला जाणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट नाही तर सूर्यकुमार ठरतोयं ‘या’ खेळाडूसाठी धोकादायक, भारताच्या दिग्गजाचे आश्चर्यकारक विधान
‘तो रिषभ पंत नाही, दोघांत खूप अंतर’, खराब प्रदर्शनावरुन पाकिस्तानी दिग्गजाचा सॅमसनवर निशाणा
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासोबत मग्न, पत्नी रितीकासोबतचे फोटो केले शेअर