वनडे मालिकेत श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघ टी२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. रविवारी (२५ जुलै) टी२० मालिकेचा पहिला सामना खेळला जाईल. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वनडे मालिका २-१ ने जिंकली. टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताना भारतीय कर्णधार शिखर धवनच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा होईल.
शिखरच्या नावे जमा होणार नकोसा विक्रम
कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला रविवारी (२५ जुलै) भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ८ वाजता सुरुवात होईल. भारताचा प्रभारी कर्णधार असलेला शिखर धवन प्रथमच टी२० सामन्यात नेतृत्व करताना दिसेल. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानावर उतरताना त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा होईल. (shikhar dhawan will become oldest indian captain in t20)
शिखर रविवारच्या सामन्यात कर्णधार म्हणून उतरल्यानंतर भारताचा सर्वात वयस्कर टी२० कर्णधार म्हणून ओळखला जाईल. शिखर ३५ वर्ष व २३२ दिवस इतके वय असताना हे कर्णधारपदाचे पदार्पण करेल. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावे होता. त्याने तीस वर्षे आणि २३४ दिवस इतके वय असताना २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध प्रथम भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
भारताकडून वनडे सामन्यात सर्वाधिक वय असताना नेतृत्व करण्याचा विक्रम देखील शिखराच्या नावे जमा आहे. त्याने याच दौऱ्यावरील वनडे मालिकेत ३५ वर्ष व २२५ दिवस इतके वय असताना भारताचे नेतृत्व केले होते.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी व चेतन सकारिया.
पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव व देवदत्त पडिक्कल हे इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाल्यास संघनिवडीसाठी उपलब्ध नसतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-माही नव्या इनिंगला करणार सुरुवात, प्रशिक्षण क्षेत्रात ठेवणार पाऊल; पाकिस्तानातून भविष्यवाणी
-विराट-सचिनच्या तुलेनवर भडकला पाकिस्तानी क्रिकेटर; म्हणे, ‘अशी निरर्थक गोष्ट करणे थांबवा’