---Advertisement---

हे काय? शिखर धवन गडबडीत घालून आला वेगळीच जर्सी, नाव लपवण्यासाठी वापरली भन्नाट युक्ती

Shikhar-Dhawan-Wrong-Jersey
---Advertisement---

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. कारण क्रिकेटच्या मैदानावर कधी काय होईल, हे सांगता येत नाही. असेच भारतीय सलामीवीर शिखर धवन हा शार्दुल ठाकूर याची जर्सी घालून मैदानावर फलंदाजीला आला असल्याची मजेशीर घटना घडली आहे. धवनने या जर्सीमागील शार्दुलचे नाव लपवण्यासाठी गमतीशीर शक्कलदेखील लढवली आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात हरारे येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात हा प्रसंग घडला आहे. 

धवन घालून आला शार्दुल ठाकूरची जर्सी
झिम्बाब्वेविरुद्धच्या (India vs Zimbabwe) तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे उपकर्णधार धवन आणि कर्णधार राहुल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर आले. मात्र धवनची जर्सी पाहून दर्शक गोंधळल्याचे दिसले. कारण धवन (Shikhar Dhawan) त्याचे नाव असलेली आणि ४२ क्रमांकाची जर्सी न घालता वेगळ्याच जर्सीसह मैदानात उतरला होता.

त्याच्या जर्सीमागे ५४ नंबर लिहिलेला होता. तसेच वरती नावावर मोठी चिकटपट्टी लावून नाव झाकण्यात आले होते. खरे तर, ५४ क्रमांकाची जर्सी शार्दुल ठाकूर घालतो. अर्थात धवन शार्दुलची जर्सी घालून मैदानात उतरला होता. कदाचित याचमुळे त्याने जर्सीवरील नावही चिकटपट्टीने लपवले होते.

धवनला अशाप्रकारची जर्सी घालून मैदानात आल्याचे पाहून चाहते बीसीसीआयची खिल्ली उडवत आहेत. तसेच काहींनी बीसीसीआय आणि किट स्पॉन्सर्स एमपीएल स्पोर्ट्सवर टिकाही केली आहे.

https://twitter.com/_ajaykrishnan_/status/1561615728536477698?s=20&t=Ulc4fDZ7e47QsBo78NV8Eg

https://twitter.com/AntaryamiBhol/status/1561629175248695296?s=20&t=9A0_PMSV82E_Ite5xLOpRA

दरम्यान भारतीय क्रिकेटपटूंनी इतर क्रिकेटपटूंची जर्सी घालून मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावरही असे पाहिले गेले होते. या दौऱ्यातील एका सामन्यात २ खेळाडू अर्शदीप सिंगची जर्सी घालून आले होते. तसेच स्वत: अर्शदीपही त्या सामन्यात होता. म्हणून एकदाच मैदानावर ३ अर्शदीप खेळत असल्याचे पाहून दर्शक गोंधळले होते.

झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन, केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, कुलदीप यादव, आवेश खान

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---