---Advertisement---

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, सट्टेबाजीमुळे आयपीएलमधूनही घालण्यात आलीय आजीवन बंदी

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा माजी संघमालक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त पुढे येत आहे. त्याच्यावर पॉर्नोग्राफी म्हणजेच अश्लील चित्रपट बनवल्याचा आणि काही ऍप्सवर ते अपलोड केल्याचा आरोप आहे. महत्त्वाचे म्हणजे, विवादांमध्ये अडकण्याची ही राज कुंद्राची पहिली वेळ नाही. यापुर्वी सट्टेबाजी प्रकरणामुळे त्याच्यावर आयपीएलमधून आजीवन निलंबित करण्यात आले होते.

मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितले की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई क्राईम ब्रांचमध्ये पॉर्नोग्राफी चित्रपट बनवला जाण्याचा आरोप दाखल करण्यात आला होता. तक्रारीत असा आरोप लावण्यात आला होता की, हे चित्रपट बनवून काही ऍप्समार्फत अपलोड केले जातात. या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपला तपास सुरू केला.

https://twitter.com/ANI/status/1417173746247344128?s=20

आयुक्तांनी म्हटले की, तपासादरम्यान स्पष्ट झाले की, या रॅकेटमध्ये राज कुंद्रा मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांना त्याच्याविरुद्ध अनेक ठोस पुरावे सापडले आहेत. त्यानंतर सोमवारी (१९ जुलै) त्याला अटक करण्यात आली. त्यांनी असेही म्हटले की, या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, सर्वप्रथम सॉफ्ट पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचा महाराष्ट्र सायबर सेलने जबाब घेतला होता. सेलने यावर्षी २६ मार्च रोजी याप्रकरणात एकता कपूरचाही जबाब नोंदवला होता.

याव्यतिरिक्त शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी महाराष्ट्र सायबर सेलला जबाब दिला आहे की, त्यांना ऍडल्ट इंडस्ट्रीत आणणारा राज कुंद्रा आहे. त्याने शर्लिनला प्रत्येक प्रोजेक्टसाठी ३० लाख रुपये दिले आहेत. शर्लिनने राज कुंद्रासोबत जवळपास १५ ते २० प्रोजेक्ट्स केले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1417177425021046784?s=20

राज कुंद्राने सट्टेबाजीचे आरोप केले होते मान्य
साल २००९ मध्ये व्यावसायिक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मॉरिशसच्या एका कंपनीच्या मदतीने राजस्थान रॉयल्स संघ विकत घेतला होता. मात्र अवघ्या ४ वर्षांनंतर म्हणजेच २०१३ मध्ये राजस्थान संघाला मोठा धक्का बसला होता. कारण संघमालक राज कुंद्राला याचवर्षी दिल्ली पोलिसांनी सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक केली होती. याबरबरोच स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणातही त्याचे नाव आले होते.

याप्रकरणी राजस्थान संघाच्या काही खेळाडूंनाही अटक झाली होती. यामध्ये वेगवान गोलंदाज एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजिंक चंदेला यांचा समावेश होता. यावेळी राज कुंद्राने आपण सट्टा लावला असल्याची कबुलीही दिली होती. त्यानंतर राजस्थान संघाला २ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. तर २०१५ मध्ये राज कुंद्रावर आयपीएलमधून आजीवन बंदी घालण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

भुवनेश्वर-हार्दिकच्या जोडीवर सर्वांचे लक्ष, मनीष पांडेऐवजी ‘या’ युवा खेळाडूला मिळू शकते संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---