मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड व त्याच्या संघाला येत्या काही महिन्यांत अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिजला टी२० मालिका खेळायच्या आहेत. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीज टी२० विश्वचषकात आपले विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. दरम्यान, विद्यमान कर्णधार पोलार्डने भविष्यात वेस्ट इंडिज संघाची धुरा सांभाळणार्या खेळाडूंच्या नावाचा खुलासा केला आहे.
हा असेल भविष्यात कर्णधार
आयपीएल २०२१ मध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर कायरन पोलार्ड सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे. या रिकाम्या वेळेत त्याने एका टिव्ही चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये बोलताना त्याने वेस्ट इंडीजच्या पुढील कर्णधाराविषयी अंदाज व्यक्त केला.
पोलार्ड म्हणाला, “मला वाटते की, शिमरॉन हेटमायरने मागील काही काळात भविष्याविषयी आशा जागवल्या आहेत. पुढील काही वर्षात तो वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू असेल. तो संघाचा भविष्यातील कर्णधार ही होऊ शकतो. त्याने तिन्ही स्वरूपात खेळावे अशी आमची इच्छा आहे. परंतु, त्याला कोणत्या स्वरुपात अधिक खेळायला आवडेल हे त्याने ठरवावे. वनडे क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी चांगली आहे. आयपीएलमध्येही त्याने आपली क्षमता दाखवलीय.”
सततच्या दुखापतीमुळे व मागील काही काळापासून सातत्याने खेळत नसल्याने हेटमायरला नव्या वार्षिक करारात स्थान दिले गेले नाही. मात्र पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकांसाठी त्याची संघात निवड झालेली आहे.
अशी आहे हेटमायरची आकडेवारी
हेटमायरने वेस्ट इंडीजसाठी आत्तापर्यंत ४५ वनडे सामने खेळताना १४३० धावा केल्या आहेत. यात पाच शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर, २७ आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये या डाव्या हाताच्या फलंदाजाने ३७९ धावा फटकावल्या असून, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट ११६ आहे. एकूण टी२० कारकीर्दीबद्दल बोलायचे झाल्यास या कॅरेबियन फलंदाजाने ८६ सामन्यांत १३२ च्या स्ट्राईक रेटने १६६९ धावा केल्या आहेत. हेटमायरने आयपीएलमध्ये १५० च्या स्ट्राइक रेटने २३ सामन्यांत ३५९ धावा केल्या आहेत. सध्या तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जेव्हा मी अफगाणिस्तानचा प्रशिक्षक झालो, तेव्हा लोकांनी माझी चेष्टा केली’
पायाचा अंगठा फ्रॅक्चर असतानाही कशी केली होती गोलंदाजी, नील वॅगनरने केला खुलासा
केएल राहुलसोबत डान्स करत असलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? घ्या जाणून