---Advertisement---

“दुबे आणि राणा काय ऑल-राउंडर नाहीत, केवळ हार्दिकच…,” माजी निवडकर्त्याचे भारतीय खेळाडूंबद्दल वक्तव्य

On: शनिवार, जुलै 25, 2026 2:03 PM
---Advertisement---

भारतीय पुरुष टी 20 संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तेथे भारत तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळणार असून, पहिला सामना जिंकत संघाने उत्तम सुरूवात केली आहे. असे असले तरी भारतीय चाहते आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यातील संघाची निराशाजनक कामगिरी काही विसरणार नाहीत. मागील मालिकांसाठी निवडलेल्या संघांवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आता माजी निवडकर्त्याने संघात केवळ एकच ऑल-राउंडर असून तो हार्दिक पंड्या आहे, असे वक्तव्य केले आहे.

पुढील वर्षी, 2027 मध्ये वनडे विश्वचषक आहे. यामुळे सर्व देश सर्वोत्तम संघ तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र भारताच्या अष्टपैलूंच्या पर्यायांवर के श्रीकांत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हार्दिक सध्या फिटनेटच्या समस्येशी झुंजत आहे. त्यामुळे त्याच्याजागी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये योगदान देतील, अशा खेळाडूंच्या शोधात भारत आहे.

श्रीकांत यांनी हार्दिकच्या जागी शिवम दुबे आणि हर्षित राणा हे पर्याय म्हणून फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते, दुबे आणि राणा काही अष्टपैलू खेळाडू नाहीत. तसेच त्यांनी नितीश कुमार रेड्डीला ‘अर्ध-अष्टपैलू’ म्हटले आहे.

“दुबे आणि राणासारख्या खेळाडूंना ‘अष्टपैलू’ म्हणता येणार नाही. जर या दोघांना तसे म्हटले जात असेल, तर मी स्वत:ला एक ‘महान अष्टपैलू’ म्हणू शकेन. हार्दिक पांड्या हाच एकमेव खरा अष्टपैलू आहे. नितीश कुमार रेड्डी हा ‘अर्ध-अष्टपैलू’ आहे, जो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि काही षटके गोलंदाजीही करू शकतो,” असे श्रीकांत यांनी स्टार स्पोर्ट्सवर म्हटले आहे.

भारताने नुकतेच इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली. या मालिकेत हार्दिक, हर्षित आणि नितीश दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. त्यामुळे दुबे हा प्रमुख वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून खेळला. त्याने दोन सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आणि 4.92 इकॉनॉमी रेटने धाव देत 2 विकेट्स घेतल्या, मात्र फलंदाजीत निराशा केली. त्याला एका सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली असता तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

दुबेला अंतिम अकरामध्ये जागा मिळाल्याने कुलदीप यादवला बाकावर बसावे लागले. संघनिवड पाहता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा अष्टपैलू खेळाडूंची निवड करण्यावर अधिक भर दिसला. फलंदाजी करू शकणारे वेगवान गोलंदाज उपलब्ध नसल्याने व्यवस्थापनाने विकेट्स घेता यावे यासाठी अक्षर पटेलला या एकमेव फिरकी गोलंदाज संघात घेतला.

तसेच श्रीकांत यांनी रवींद्र जडेजाला पूर्णपणे संघातून वगळले आहे का, हा प्रश्नही उपस्थित केला. जडेजाने केवळ टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र त्याला केवळ काही कसोटी सामन्यांमध्येच खेळवले जाते.

“जडेजाला पूर्णपणे का वगळण्यात आले आहे, हे मला समजत नाही. 2023च्या विश्वचषकात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तो एक ‘सायलेंट किलर’ (शांत राहून घातक कामगिरी करणारा) आहे. त्याने ODI मधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. तरीही, तो ODI सामने अजिबात खेळत नाही आणि कसोटी सामन्यांतही त्याला क्वचितच संधी मिळते, किंबहुना जेव्हा संधी मिळते तेव्हा तो सामना जिंकून देणारी कामगिरी करतो. जर जडेजा चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला संघाच्या योजनांमध्ये आणि संघात नक्कीच स्थान असायला हवे,” असे श्रीकांत यांनी म्हटले आहे. (Shivam Dube and Harshit Rana aren’t all-rounders; only Hardik is…” – Former selector makes a bold statement)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---