INDIA VS AFGHANISTAN T20I : भारत विरूद्ध अफगानिस्तान (IND vs AFG) टी-20 मालिकेचा पहिला सामना मोहाली येथे पार पडला. भारताने मिळालेले 159 धावांचे आव्हान 18 व्या षटकांतच पूर्ण करत, 6 विकेट्स राखून सहज विजय मिळवला. विजयाचा ‘हिरो’ ठरला तो म्हणजे मुंबई आणि चेन्नई सूपर किंग्सचा फलंदाज शिवम दूबे(Shivam Dube). शिवमने केवळ 40 चेंडूत 60 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तसेच त्याने गोलंदाजी करत आपल्या 2 षटकात केवळ 9 धावा देत 1 विकेटही घेतली. या कामगिरी मूळे त्याला ‘सामनावीर’ घोषित केले गेले.
‘यंग ब्रिगेड’ ने केली जबरदस्त कामगिरी
भारताची फलंदाजीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे, यूवा फलंदाजांनी केलेली कामगिरी. शिवमच्या 60 धावां व्यतिरिक्त विकेटकीपर जितेश शर्मा, रिंकू सिंग(Rinku Singh) आणि शुबमन गिल(Shubman Gill) यांनी चांगली कामगिरी केली. जितेश आणि शिवमने 45 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. तर रिंकूने 9 चेंडूत 16 धावा करत फिनीशिंग टच दिला. तत्पूर्वी 14 महिन्यांनतर ‘कमबॅक’ करत असलेला रोहित शर्मा(Rohit Sharma) मात्र धाव न करताच रन-आउट झाला. (India vs Afghanistan First T20 cricket match as it happened)
6⃣,4⃣ and Shivam Dube wraps the chase in style 🙌#TeamIndia win by 6 wickets and take a 1-0 lead in the T20I series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/BkCq71Zm6G#INDvAFG | @IDFCFIRSTBank | @IamShivamDube pic.twitter.com/4giZma4f1u
— BCCI (@BCCI) January 11, 2024
नबीची आक्रमक खेळी, भारतीय गोलंदाजीचा यशस्वी मारा
अफगानिस्तानची फलंदाजी जास्त कमाल करून दाखवू शकली नाही. अनुभवी मोहम्मद नबीने मात्र एकट्याने लढा दिला. त्याने केवळ 27 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. त्याला अझमतूल्लाह ओमरझायीने 29 धावांची खेळी केली. भारताने भेदक गोलंदाजी करत अफगानला केवळ 158 धावांपर्यंतच रोखले. यात अक्षर पटेल आणि मूकेश कूमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर शिवमने 1 विकेट घेतली. (Shivam Dube shines on Rohit Sharma’s return as hosts take 1-0 lead in Mohali)
वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या
IND vs AFG: ‘पंड्याचा लवकरच होणार संघातून पत्ता कट?’, ‘या’ युवा अष्टपैलूने ठोकला जागेवर दावा
रोहित आणि गिलमध्ये LIVE सामन्यात राडा, विजयानंतर कर्णधाराने जिंकले मन; म्हणाला, ‘माझी एवढीच इच्छा होती की….’