चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान खेळला गेला. रविवारी (दि. 14 मे) पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता संघाने चेन्नईला 6 गडी राखून पराभूत केले. चेन्नईला या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी, या हंगामात चेन्नईच्या फलंदाजीची धुरा वाहणाऱ्या शिवम दुबे याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या चेन्नईच्या फलंदाजांना या सामन्यात काहीसे अपयश आले. दोन्ही सलामीवीर व अजिंक्य रहाणे यांना मनासारखी कामगिरी करता आली नाही. अशावेळी शिवम दुबे याने पुन्हा एकदा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 34 चेंडूवर 48 धावा केल्या. यामध्ये एक चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात त्याला जास्त संधी न मिळाल्याने तो अर्धशतकापासून वंचित राहिला.
दुबे मागील पाच वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. आरसीबीसाठी दोन व राजस्थानसाठी एक वर्ष खेळल्यानंतर तो मागील वर्षी चेन्नई संघात दाखल झालेला. तिथे त्याने आपली छाप पाडली. त्याच्या चालू हंगामातील कामगिरीचा विचार केल्यास त्याच्या खेळात कमालीचे सुधारणा झाल्याचे दिसते. त्याने 13 सामन्यातील अकरा डावांमध्ये फलंदाजी करताना 40.33 च्या सरासरीने 363 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 157.14 असा दमदार राहिला. विशेष म्हणजे त्याने आपल्या या धावांमधील 228 धावा केवळ षटकार चौकारांनी पूर्ण केले आहेत. त्याच्या नावे हंगामात 30 षटकार व 12 चौकारांची नोंद आहे.
केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर बोलताना चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने त्याचे कौतुक करताना, त्याने आम्हाला अपेक्षित असलेली कामगिरी करून दाखवली असे म्हटले. भविष्यात तो आणखी अनेक वर्षाचे नाही संघाचा महत्त्वाचा भाग राहू शकतो.
(Shivan Dube Explosive Batting Help CSK In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
VIDEO:..आणि गावसकरांनी शर्टवर घेतला धोनीचा ऑटोग्राफ, पाहा आयपीएलमधील सर्वात भावनिक क्षण
धोनीने चेन्नईत खेळला अखेरचा सामना? चेपॉकवर फेरी मारत चाहत्यांना म्हणाला, “थॅन्कू”, पाहा व्हिडिओ