टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये तेराव्या दिवसाची (४ ऑगस्ट) सुरुवात भारतासाठी अप्रतिम झाली. भालाफेक खेळात ग्रूप एमधील पात्रता फेरीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम सामन्याचे तिकीट गाठले आणि भारताच्या पदकाच्या आशा आणखी वाढवल्या. मात्र, असे असले तरीही, ग्रूप बीमध्ये उतरलेला दुसरा भारतीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याने सर्वांना निराश केले. शिवपाल अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
शिवपालने तीन प्रयत्नात केला सर्वाधिक ७६.४० मीटरचा थ्रो
शिवपालच्या तिन्ही प्रयत्नांनंतरही ८३.५० मीटर अंतराचा पात्रता मार्कपासून तो खूपच दूर राहिला. तो आपल्या तिन्ही प्रयत्नात ७६.४० मीटर, ७४.८० मीटर आणि ७४.८१ मीटरचा थ्रो करू शकला. (India’s Shivpal Singh fails to qualify for the men’s javelin throw final)
#IND debutant Shivpal Singh fails to make the cut for the men's javelin throw final after his best finish lands at a distance of 76.40m. #StrongerTogether | #UnitedByEmotion | #Tokyo2020 | #Olympics
— Olympic Khel (@OlympicKhel) August 4, 2021
विशेष म्हणजे, ग्रूप एनंतर ग्रूप बीमधील एकाही भालाफेकपटूला नीरजप्रमाणे पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटरचे अंतर पार करता आले नाही. ग्रूप बीमधून केवळ पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८५.१६ मीटरचे अंतर पार करत नीरजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याच्या व्यतिरिक्त झेक प्रजासत्ताकच्या जाकुब वाडलेच (८४.९३ मीटर) आणि जर्मनीच्या जुलियन वेबर (८४.४१ मीटर)चे अंतर पार करत थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
भालाफेक खेळाची अंतिम फेरी शनिवारी (७ ऑगस्ट) रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी
-बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक
-लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी