---Advertisement---

BREAKING: शिवराज पुन्हा ठरला महाराष्ट्र केसरी! धाराशिव मुक्कामी जिंकली मानाची गदा, हर्षवर्धन सदगीर पराभूत

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आयोजक सुधीर (अण्णा) पाटील यांच्या माध्यमांतून धाराशिव येथे आयोजित केल्या गेलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम लढत शिवराज राक्षे विरुद्ध हर्षवर्धन सदगीर अशी झाली. यामध्ये शिवराजने हर्षवर्धन याचा 6-0 अशा गुणांच्या फरकाने पराभव करत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. शिवराजला मानाच्या स्व. मामासाहेब मोहोळ गदेने सन्मानित केले गेले.

धाराशिव येथे मागील पाच दिवसांपासून होत असलेल्या या स्पर्धेत माती गटातून हर्षवर्धन सदगीर याने गणेश जगताप याचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर शिवराज याने पृथ्वीराज मोहोळ याच्यावर मात केली होती. हे दोघेही यापूर्वी महाराष्ट्र केसरी ठरले असल्याने त्यांच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी होण्याची संधी होती.

अंतिम सामन्यात शिवराजने सुरुवातीला तीन गुण घेत सुरुवात केली. त्यानंतर त्याने हर्षवर्धन याला रिंगच्या बाहेर ढकलत आणखी दोन गुणांची कमाई केली. त्याचवेळी हर्षवर्धन याला दुखापत झाली. उर्वरित शिवराजने सावध खेळ करताना दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.

विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला पुणे येथे झालेल्या स्पर्धेत देखील शिवराज हा विजेता झाला होता. तसेच दोन आठवड्यांपूर्वी फुलगाव येथील स्पर्धेत त्याला सिकंदर शेख याच्याकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागलेले. महाराष्ट्र राज्यात कुस्तीच्या दोन संघटना निर्माण झाल्याने, या दोन्ही वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्या जातात.

(Shivraj Rakshe Becomes Maharashtra Kesari 2023 In Dharashiv Beat Harshvardhan Sadgir)

हेही वाचा-
World Cup Final मध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचे पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन, ड्रेसिंग रूममध्ये पोहचून… 
World Cup गमावला तरी ICC ने केला रोहितचा सन्मान, इतर 5 भारतीयांनाही मिळाले मानाचे स्थान, वाचा सविस्तर 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---