सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये जसप्रीत बुमराहचं नाव अव्वल 3 मध्ये नक्कीच येईल. बुमराह हा असा वेगवान गोलंदाज आहे, जो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
बुमराह सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे. या दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं बुमराहबाबत एक मोठं वक्तव्य केलं. अख्तरनं बुमराहला चक्क कसोटी क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला आहे!
वास्तविक, अख्तरचं असं मत आहे की बुमराहनं कसोटी क्रिकेट सोडून फक्त लहान फॉरमॅट खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एका पॉडकास्टमध्ये बुमराहबद्दल बोलताना अख्तर म्हणाला, “तो लहान फॉरमॅटमध्ये खूप चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे लाईन आणि लेन्थ समजून घेण्याची कला आहे. बुमराह नवीन चेंडूनं खूप चांगली गोलंदाजी करतो. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. कसोटी फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ गोलंदाजी करावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला वेगाची आवश्यकता असते. परंतु जर सीम आणि रिव्हर्स होत नसेल तर ते तुमच्यासाठी कठीण होऊन होईल. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मात्र तरीही माझं मत आहे की तो कसोटीत चांगला विकेट घेणारा गोलंदाज आहे.”
शोएब अख्तर पुढे बोलताना म्हणाला, जर बुमराहला कसोटी फॉरमॅटमध्ये खेळणं सुरू ठेवायचं असेल तर त्याला त्याचा वेग वाढवावा लागेल. मात्र वेग वाढवल्यास दुखापत होण्याचा धोका असतो. जर मी बुमराह असतो तर मी फक्त छोट्या फॉरमॅटमध्ये खेळलो असतो.”
येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, आतापर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये बुमराहचा रेकॉर्ड खूपच उत्कृष्ट राहिला आहे. त्यानं 42 सामन्यात 182 विकेट घेतल्या, ज्यामध्ये त्यानं 11 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहे.
हेही वाचा –
24 तासांत आणखी एका पाकिस्तानी दिग्गजाची निवृत्ती, दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
गाबा कसोटी: रोहित शर्माकडून चूक? टॉस हरल्यानंतरही पॅट कमिन्स या निर्णयामुळे आनंदी
2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही, PCB ने अशी केली आपली मागणी पूर्ण