‘रावपिंडी एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या त्रस्त आहे. अख्तरने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ अपलोड करून लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. खरं तर, ४६ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाजाच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. मेलबर्नमधील हॉस्पिटलमधील बेडवरून त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/tv/Cg5pMIWAeAZ/?utm_source=ig_web_copy_link
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही आपली शेवटची शस्त्रक्रिया असेल, अशी आशा अख्तरने व्यक्त केली आहे. त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर अख्तरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “पाच ते सहा तासांची शस्त्रक्रिया झाली. दोन्ही गुडघ्यांमुळे मी त्रस्त आहे. मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. निवृत्तीला ११ वर्षे झाली तरी मी त्रस्तच आहे. मी अजून चार ते पाच वर्षे खेळू शकलो पण मला माहीत होतं की मी खेळलो तर व्हील चेअरवर जाईन. पण मी जे काही केले आहे ते पाकिस्तानसाठी केले आहे. संधी मिळाली तर पुन्हा करेन.”
https://www.instagram.com/tv/Cg73MU1j_WA/?utm_source=ig_web_copy_link
शोएब अख्तर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो वेळोवेळी त्याचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर शोएब कॉमेंट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याचे स्वतःचे युट्यूब चॅनल देखील आहे ज्यावर तो खूप सक्रिय आहे. शोएब अख्तर गेल्या महिन्यात (जुलै) हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेला होता. त्यानंतर अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वत: सैतानाला दगड मारतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता.
शोएब अख्तरची कारकिर्द
शोएब अख्तरने पाकिस्तानसाठी ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १७८, एकदिवसीय सामन्यात २४७ आणि टी-२० मध्ये १९ बळी घेतले आहेत. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये ४०० हून अधिक शिकार केल्या आहेत. शोएबने २००२मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १०० मैलांच्या वेगाने चेंडू टाकला होता. जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा अख्तर हा पहिला गोलंदाज होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?
INDvsZIM। ‘भारताच्या पुढील दौऱ्याचे वेळापत्रक आणि बरंच काही…’, फक्त एका क्लिकवर
रोहित हार्दिकसह संपूर्ण टीम इंडियाने पाहिली CWG2022 महिला क्रिकेटची थरारक फायनल, फोटो व्हायरल






