पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपला सर्वकालिन एकदिवसीय संघ निवडला आहे. या संघांमध्ये शोएबने भारतीय संघाचा महान क्रिकेटपटू आणि प्रतिस्पर्धी सचिन तेंडुलकर याला निवडले आहेत. तसेच विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कपिलदेव यांनाही आपल्या संघामध्ये सहभागी करून घेतले आहे.
त्याचबरोबर या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वकालिन अकरा खेळाडूंच्या यादीमध्ये 4 पाकिस्तानी खेळाडूंचा देखील समावेश आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की, पाकिस्तानचा पंतप्रधान आणि विश्वचषक विजेता कर्णधार इम्रान खानचा या संघांमध्ये समावेश केलेला नाही.
आपल्या संघाचे सलामीवीर फलंदाज म्हणून शोएबने वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू गॉर्डन ग्रीनिज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हक याचा समावेश केला आहे. सईद अनवरला चौथ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. याबाबत शोएब म्हणाला की, “जर अनवर आजच्या काळात असता तर त्याने सध्याच्या काळातील गोलंदाजाची अवस्था खराब केली असती.”
तर शोएबने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला यष्टिरक्षक बनवले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज अॅडम गिलक्रिस्टचा देखील या संघात समावेश केला आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून युवराज सिंगला सातव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. वसीम अक्रम, वकार युनूस आणि कपिल देव यांचा देखील या संघात समावेश आहे. महान फिरकीपटू शेन वॉर्नला अकरावा खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आणि महत्वाचे म्हणजे त्याने त्याला कर्णधारही बनविले आहे.
आतापर्यंत पाकिस्तानने फक्त एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तेव्हा इम्रान खानने संघाचे नेतृत्व केले होते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्रान खानचा अजूनही एक क्रिकेटपटू म्हणून खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण शोएबने त्याला न सामील करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
शोएब अख्तरचा सर्वकालीन एकदिवसीय संघ
गॉर्डन ग्रीनिज, सचिन तेंडुलकर, इंझमाम-उल-हक, सईद अन्वर, एमएस धोनी, अॅडम गिलक्रिस्ट, युवराज सिंग, वसीम अक्रम, वकार युनूस, कपिल देव आणि शेन वॉर्न (कर्णधार)
महत्त्वाच्या बातम्या-
‘खरचं.. भारतीय संघाचा हेवा वाटतो, त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत,’ विरोधी संघातून कौतुकाचा वर्षाव
प्यार का कोई धर्म नही होता! दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करणारे ‘हे’ आहेत भारतीय क्रिकेटर