---Advertisement---

तीन आठवड्यांच्या सुटीनंतर टीम इंडिया जोमात; इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी असा सुरू झाला सराव, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

डरहॅम। भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांना यजमानांविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेची जोरदार तयारी भारतीय संघाने डरहॅम येथे सुरु केली आहे. नुकताच बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तीन आठवड्यांच्या सुटीनंतर भारतीय संघ एकत्र
भारतीय संघाने इंग्लंडला आल्यानंतर सर्वात आधी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध ८ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना ३ आठवड्यांची सुटी दिली होती. या सुटीनंतर आता इंग्लंडविरुद्धच्या अगामी कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी भारतीय खेळाडू १४ जुलैला डरहॅमला पोहचले असून आता त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे.

बीसीसीआयने शेअर केलेला हा व्हिडिओमध्ये भारतीय संघाच्या स्ट्रेंथ आणि मॉबिलिटी सत्राचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासह भारतीय संघातील अन्य खेळाडू मैदानावर घाम गाळत आहे. भारतीय क्रिकेटपटू या व्हिडिओमध्ये पळताना दिसत आहेत, तसेच फुटबॉल खेळताना आणि क्षेत्ररक्षणाचा सराव करतानाही दिसत आहेत. त्याचबरोबर एका गमतीशीर क्षणी विराट मैदानावर लोटपोट झालेला दिसत आहे.

एवढेच नाही तर १६ जुलैला भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलकही या व्हिडिओच्या अखेरीस पाहायला मिळते.

भारताला खेळायचा आहे सराव सामना
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला डरहॅम येथे काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळायचा आहे. हा सराव सामना २० ते २२ जुलैदरम्यान होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नॉटिंगघमला रवाना होईल. पहिला कसोटी सामना नॉटिंगघमला होणार आहे.

भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव
जरी भारतीय संघाने कसोटी मालिकेची तयारी सुरु केली असली, तरी त्यांना कोरोनाच्या संकटाचाही सामना करावा लागत आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती काहीदिवसांपूर्वी बीसीसीआयने दिली आहे. तसेच गरानी यांच्या संपर्कात आल्याने भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

त्यामुळे भारताचे हे ५ सदस्य डरहॅमला आलेले नाही. ते त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघात सामील होतील. तसेच साहा आणि पंत हे भारताचे दोन्ही प्रमुख यष्टीरक्षक क्वारंटाईन असल्याने सराव सामन्यासाठी उपलब्ध नसतील. त्यामुळे आता सराव सामन्यात केएल राहुल यष्टीरक्षण करताना दिसण्याची दाट शक्यता आहे.

असे आहे इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलपुर्वी ४० वर्षीय धोनीने कमी केले वजन, पाहा ‘स्लिम अन् फिट’ थालाचे फोटो

क्या बात! सबस्टीट्यूट यष्टीरक्षकाने मागे वळून न पाहताही उडवली दांडी, झाली धोनीची आठवण

यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकचा धोनी-संगकाराच्या मांदियाळीत प्रवेश, केली ‘ही’ अद्वितीय कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---