पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी दिली. शोएब अख्तर याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भल्या-भल्या फलंदाजांना त्रिफळाचीत केले. अख्तर त्याच्या घातक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असून त्याला ‘रावलपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखळे जायचे. मागच्या वर्षी त्याच्या बायोपिक ‘रावलपिंडी एक्सप्रेस-रनिंग अगेंस्ट द ऑड्स’ याची घोषणा केली होती. पण आता हा चित्रपट येणार नाही, अशी माहिती माजी वेगवान गोलंदाजाने दिली आहे.
स्वतःच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणे, हे प्रत्येकासाठी मोठी गोष्ट असते. शोएब अख्तर (Shoaib Akhtar) देखील त्याच्या बायोपिकसाठी उत्सुक होता. पण काही कारणास्तव त्याने या चित्रपटापासून स्वतःला वेगळे केले आहे. ‘रावलपिंडी एक्सप्रेस-रनिंग अगेंस्ट द ऑड्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत केलेला करार अख्तरने पूर्णपणे संपवला आहे. अशात जर निर्मात्यांनी हा चित्रपट बनवला आणि त्यात अख्तरचे नाव घेतले, तर तो पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहे.
शोएब अख्तरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून माहिती दिली की, “तुम्हा सर्वांना सांगताना वाईट वाटत आहे की, काही महिने विचार केल्यायनंतर मी हा करार रद्द केला आहे. मी माझा व्यवस्थापक आणि कायदेशीर टीमच्या मदतीने निर्माते आणि ‘रावलपिंडी एक्सप्रेस’ चित्रपटापासून स्वतःला वेगळे केले आहे. नक्कीच हे माझे स्वप्न होते आणि मी ते पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने काही गोष्टी चुकीच्या होत गेल्या. सतत होणारे वाद आणि करारातील अटींचे उल्लंघन होत असल्यामुळे मला हा करार अर्ध्यात रद्द करावा लागला.”
Important announcement. pic.twitter.com/P7zTnTK1C0
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) January 21, 2023
“करार रद्द केल्यानंतरही जर निर्मात्यांनी बायोपिक बनवणे सुरू ठेवले, तर माझे नाव वापरले, तर त्यांच्याविरोधात मोटी कायदेशीर कारवाईक केली जाईल,” असेही अख्तरने पुढे सांगितले. दरम्यान, अख्तरच्या या बायोपिकचे मुहम्मद फराज कैसर दिग्दर्शक आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात अख्तरने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. 16 नोव्हेंबर 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचेही अख्तरने त्यावेळी सांगितले होते. चित्रपटात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ब्रेट ली देखील दिसणार असल्याचे सांगितले जात होते. अख्तरच्या कारकिर्दीचा विचार केला तर त्याने पाकिस्तान संघासाठी 46 कसोटी, 163 वनडे आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जगातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम अख्तरच्या नावावर आहे. (Shoaib Akhtar has refused to make his own biopic. He has canceled all contracts with producers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बेबी एबी’साठी मुंबई इंडियन्सचे ‘हे’ खेळाडू आहेत आदर्श; एक रोहित, तर दुसरा कोण?
‘मलाही माहीत आहे की…’, शतकांच्या दुष्काळाविषयी रोहित शर्माने सोडले मौन