पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (shoaib akhtar) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच अख्तरच्या आईचे निधन झाले. त्याच्या आईने रुग्णालयात उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मागच्या काही दिवांसापासून त्यांची तब्येत बिघडली होती, अशी माहिती मिळाली आहे. अख्तरने स्वतः ट्वीट करून या दुःखद घटनेची माहिती सर्वांना दिली आहे.
अख्तरने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करून ही माहिती दिली. ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, ‘माझी आई, माझ्यासाठी सर्वकाही होती. ती आम्हाला सोडून स्वर्गात गेली आहे. अल्लाहतालाची मर्जी आहे.’ चाहत्यांनी देखील अख्तरच्या आईला श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (harbhajan singh) देखील अख्तरच्या दुःखात सहभागी झाला आहे.
میری والدہ محترمہ رضائے الٰہی سے وفات پا گئ ہیں – انا للہ وانا الیہ راجعون۔
نماز جنازہ H-8 میں بعد نماز عصر ادا کی جائے گی۔My mother, my everything, with the will of Allah taala, has left for heavenly abode.
Namaz e janaza will be in H-8 after Asar Prayers.— Shoaib Akhtar (@shoaib100mph) December 25, 2021
हरभजन सिंगने शोएब अख्तरला या दुःखाच्या प्रसंगी हिम्मत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हरभजनने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट केली की, ‘मी फक्त तुला एवढेच सांगू इच्छितो की, माझी सहानुभूती तूझ्यासोबत आहे. तू मजबूत बनून राहा माझ्या भावा. वाहे गुरू महर करो.’
Just wanted to reach out and let you know that you have my heartfelt condolences during this difficult time. May she rests in peace. Be strong my brother. Waheguru Mehar kare🙏🙏 https://t.co/jpoz51fF7a
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 26, 2021
शोएब अख्तर एक असा पाकिस्तानी खेळाडू आहे, ज्याने मैदानावर तर अनेकदा भारतीय खेळाडूंसोबत वाद घातला, पण खऱ्या आयुष्यात तो अनेकदा भारतीय खेळाडूंच्या सुखदुःखात धावून आला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा वेगावन गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले हेते. त्यानंतर अख्तरने सिराजच्या वडिलांसाठी ट्वीटरवर श्रद्धांजली अर्पण केली होती.
त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याला स्वतःच्या वडिलांना पाहता नाही आले. मात्र, त्याच्या प्रदर्शनाने वडिलांना श्रद्धांजली दिली आहे. त्याने स्वतःच्या भावना चेंडूवर दाखवल्या आणि पाच विकेट्स घेतल्या.’ दरम्यान, सिराजचे वडील जेव्हा निधन पावले होते, तेव्हा तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत होता. त्या मालिकेत सिराजने लाजवाब प्रदर्शन करून दाखवले होते.
महत्वाच्या बातम्या –
हर्षा भोगलेंनी निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’! ‘या’ तिघा भारतीयांची लागली वर्णी
गांगुली की धोनी? सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर भज्जी म्हणाला…
दक्षिण आफ्रिका गाजवणाऱ्या ‘टॉप ३’ जोड्यांमध्ये सामील झाले मयंक-राहुल
व्हिडिओ पाहा –