यूएई आणि ओमानमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील अशी भविष्यवाणी कोणीच केली नव्हती. या सर्व गोष्टींना मागे टाकत ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि जेतेपदही मिळवले. हे जेतेपद मिळवून देण्यात डेविड वॉर्नरने मोलाची भूमिका बजावली. त्याने अप्रतिम फलंदाजी करत टी२० विश्वचषकाचा मालिकावीर पुरस्कार देखील पटकावला. दरम्यान या पुरस्काराची घोषणा केल्यानंतर माजी पाकिस्तान गोलंदाज शोएब अख्तरने एक ट्विट केले आहे,जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
डेविड वॉर्नरने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत ७ सामन्यात ४८.१७ च्या सरासरीने २८९ धावा केल्या. या स्पर्धेत डेविड वॉर्नर व्यतिरिक्त आणखी एक फलंदाज होता, ज्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तो म्हणजे बाबर आजम. बाबर आजमने या स्पर्धेतील ६ सामन्यात ६०.६० च्या सरासरीने ३०३ धावा केल्या होत्या. त्यामुळे शोएब अख्तरचे म्हणणे आहे की, डेविड वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देऊन बाबर आजमवर अन्याय केला गेला आहे.
डेविड वॉर्नरची मालिकावीर म्हणून निवड झाल्यानंतर शोएब अख्तरने एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले की, “मला असे वाटत होते की, बाबर आजमला मालिकावीर पुरस्कार दिला गेला पाहिजे होता. हा अन्याय आहे…”
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी डेविड वॉर्नर फॉर्ममध्ये नव्हता. त्याला खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत होता.परंतु न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्याने ५३ धावांची खेळी केली होती.
Was really looking forward to see @babarazam258 becoming Man of the Tournament. Unfair decision for sure.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 14, 2021
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १७२ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये कर्णधार केन विलियमसनने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली होती.या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी आणि ७ चेंडू शिल्लक असताना आव्हान गाठले. ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या-
सिटी कप २०२१: जाएंटझ अ आणि स्निग्मय एफ.सी दुसऱ्या फेरीत