आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रदर्शनात खूपच चढ उतार पाहायला मिळाले. सुपर 12 फेरीत पाकिस्तान भारत आणि जिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवांनंतर कसाबसा उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्य सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला मात दिली. पण अंतिम सामन्यात मात्र इंग्लंडने पाकिस्तानवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. अंतिम सामन्यात शाहीन आफ्रिदी याला झालेली दुखापत पाकिस्तानला चांगलीच महागात पडल्याचे सर्वांनी पाहिले. आता त्यांचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आफ्रिदीला झालेल्या दुखापतीविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) पाकिस्तानसाठी चांगले प्रदर्शन करत होता. पण अंतिम सामन्यात त्याला स्वतःची चार षटके टाकता आले नाहीत. अंतिम सामन्यात आफ्रिदीला झालेली दुखापत पाकिस्तानला चांगलीच महागात पडली. इंग्लंडने हा सामनात एक षटक शिल्लक ठेवून जिंकला, पण आफ्रिदीला जर अर्ध्यातून मैदान सोडावे लागले नसते, तर नक्कीच निकालावर याचा परिणाम झाला असता. आफ्रिदीविषयी बोलताना शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने मोठी प्रतिक्रिया दिली. आख्तरच्या मते आफ्रिदी मुळात पूर्णपणे फिट नसतानाही त्याने विश्वचषकात संघासाठी चांगली कामगिरी दिली.
माध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की, “जेव्हा तुमचा प्रमुख गोलंदाज फिट नसतो, तेव्हा संघाच्या अडचणी वाढतात. शाहीन आफ्रिदी कधीच पूर्णपणे फिट नव्हता, पण आपण सर्व दोन त्याला देऊ शकत नाही. त्याने मागच्या दोन-तीन सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली. पण हा विश्वचषकाचा अंतिम सामना होता. त्यामुळे तुमचा पाय तुटला असता, तर जे होते, ते होऊद्या, पण तुम्ही पळत राहा आणि संघासाठी काहीतरी करा. पण कितीही केले तरी, विश्वचषक आपल्या नशिबात नव्हता.”
शोएब अख्तरच्या मते अंतिम सामना कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकिर्दीतील सर्वात महतावाचा असतो. अशा या सामन्यात आफ्रिदीला दुखापत झाली असली, तरी त्याने पेनकिलर खाऊन खेळले पाहिजे होते. “एकदा तुमचे पाय सुन्न झाल्यानंतर तुम्हाला वेदना जाणवत नाहीत. होय तुम्ही एका युवा खेळाडूची कारकीर्द धोक्यात टाकत आहात. पण हा विश्वचषकाचा अंतिम सामना होता. तुम्हाला तुमच्या गोलंदाजाची कारकीर्द धोक्यात टाकायची आहे की नाही, हा कर्णधाराचा निर्णय असतो. होय हा निर्णय खूप कठीण असतो.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनने ‘या’ भारतीय गोलंदाजाबद्दल काढले गौरोद्गार, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘ही’ गोष्ट बदला, कर्णधार बदलून काय होणार, टीम इंडियाला इरफान पठाणचा सल्ला