पाकिस्तान क्रिकेट संघाचा (pakistan team) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (shoaib akhtar) याने आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. चालू वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या पुन्हा एकदा आमनासामना होणार आहे. अशात या सामन्याविषयी चाहत्यांमध्ये नक्कीच उत्सुकता आहे.
मागच्या वर्षी यूएईत खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताला मात दिली असली तरी, त्यापूर्वी पाकिस्तानचे भारताविरुद्धचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. परंतु माजी दिग्गजाच्या मते, सध्याचा पाकिस्तान संघ भारतापेक्षा अधिक मजबूत आहे आणि आगामी सामन्यात भारत पुन्हा एकदा पाकिस्तानपुढे शरणागती पत्करेल. शोएब अख्तर सध्या खेळल्या जात असलेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा भाग बनला आहे. या स्पर्धेत अख्तर एशिया लायन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शोएब अख्तरने असे सांगितले की, “आगामी टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात पाकिस्तान संघ बाजी मारेल.” हा सामना मेलबर्नमध्ये आयोजित केला जाणार आहेत, तत्पूर्वी अख्तरने ही भविष्यवाणी केली आहे. शोएब अख्तर म्हणाला की, “आम्ही मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा भारताला हरवू. टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघ भारतापेक्षा वरचढ आहे. भारतीय माध्यमे आहेत, जी स्वतःच्या संघावर विनाकारण दबाव बनवतात. जेव्हा कधी क्रिकेटमध्ये या दोन देशांत आमनासामना होईल, तेव्हा भारत पराभूत होणे स्वाभाविक आहे.”
दरम्यान, शोएब अख्तर जरी पूर्ण आत्मविश्वासाने पाकिस्तान संघाची बाजू लावून बोलत असला, तरी आजपर्यंतचा इतिहास पाहता ही गोष्ट सोपी नसेल. विश्वचषक स्पर्धेत या दोन संघात सामना खेळला गेला, तेव्हा नेहमीच भारतीय संघाचे पारडे जडे दिसले आहे. याला अपवाद फक्त २०२१ विश्वचषक ठरला. मागच्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानी गोलंदाजांसमोर पूर्णपणे अपयशी ठरला. पाकिस्तानने या सामन्यात एकही विकेट न गमावता मोठा विजय मिळवला होता. पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध मिळवलेला हा पहिला विजय ठरला होता.
महत्वाच्या बातम्या –
अखेर लखनऊ फ्रेंचायझींचे झाले नामकरण! ‘या’ नावाने उतरणार आयपीएलमध्ये
“विराटचे यश अनेकांना पचले नसते”
दक्षिण आफ्रिका दौरा संपला, आता मायदेशात ‘या’ २ संघांशी दोन हात करणार भारत; बघा स्केड्यूल
व्हिडिओ पाहा –