मुंबई । ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आयपीएल संदर्भात मोठे विधान केले आहे. तसेच आयसीसीवर टीका केली. ज्यामध्ये अख्तर म्हणतो की, आशिया चषक आणि आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाऊ शकतात. परंतु बीसीसीआयच्या दबावामुळे आयसीसीला दोन मोठ्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या.
एका टीव्ही चॅनेलवर बोलताना अख्तर म्हणाला, ”तुम्ही कशाबद्दल बोलत आहात, आतापर्यंत बीसीसीआयने आपले वर्चस्व दाखवले नाही काय? याचा अर्थ काय आहे की आपण हे होऊ देणार नाही, आम्ही कोण आहोत? कमजोर लोकांना जगात कधीही आधार मिळाला नाही. आशिया चषक स्पर्धा निश्चितपणे घेता आली असती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना घेण्याची मोठी संधी होती.”
शोएब पुढे म्हणाला, “यामागे बरीच कारणे आहेत, पण मला त्यात पडायचे नाही. टी 20 विश्वचषकही होऊ शकतो. परंतु मी आधीच सांगितले आहे की ते असे होऊ दिले जात नाही. आयपीएललचे नुकसान होऊ नये यासाठी सारा खटाटोप केला जात आहे. विश्वचषक नरकात जाऊ दे.”
आपल्या दीर्घ कारकीर्दीत त्याने 46 कसोटी सामने आणि 163 एकदिवसीय सामने खेळले. त्याच्या नावावर 178 कसोटी विकेट आणि 247 वनडे विकेट आहेत. कसोटीत त्याने 12 वेळा 5 विकेट्स घेतल्या. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम शोएबच्या नावावर आहे.