---Advertisement---

‘तो’ सल्ला न मानणे हार्दिकला पडले महागात! आज मोजतोय किंमत

hardik-pandya
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या (hardik pandya) मागच्या काही वर्षांपासून दुखापतीमुळे अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. त्याला २०१८ मधील आशिया चषकादरम्यान (asia cup 2018) दुखापत झाली होती, त्यानंतर त्याचे प्रदर्शन खालावल्याचे सतत पाहायला मिळाले आहे. अशात पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने हार्दिकच्या फिटनेसविषयी मोठे विधान केले आहे. अख्तरने सांगितल्याप्रमाणे त्याने हार्दिकला दुखापत होण्यापूर्वीच एक महत्वाची चेतावणी दिली होती.

शोएब अख्तर आकाश चोप्रांसोबत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर चर्चा करत होता. यावेळी त्याने हार्दिकला दुखापत झाली होती, त्यावेळचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “मी दुबईत बुमराहला म्हटलो, एवढेच नाही तर हार्दिकला देखील म्हटलेलो. माझ्या खांद्याच्या मागच्या मांसपेशी अजूनही मजबूत आहेत. मात्र, तो (हार्दिक) एवढा बारीक दिसत होता की, मी हैराण झालो होतो. मी त्याला चेतावणी दिली होती की, तू दुखापग्रस्त होशील. मात्र, त्याने मला सांगितले की, मी खूप क्रिकेट खेळत आहे. त्यानंतर बरोबर दिड तासांनी तो जखमी झाला.”

२०१८ साली आशिया चषकादरम्यान ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. याच सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर सामन्याच्या मधून तो मैदानाबाहेर गेला होता. या सामन्यापासून त्याच्या कारकिर्दीवर दुखापतीचा खूपच प्रभाव पडला. अख्तरने आकाश चोप्रांसोबत चर्चा करताना असाही उल्लेख केला की,  त्याने हार्दिकला त्याची कारकीर्द मोठी बनवण्यासाठी मांसपेशी वाढवण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, हार्दिक मागच्या बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असला, तरी निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला टी२० विश्वचषकात खेळण्याची संधी दिली होती. मात्र, तो या विश्वासाला पात्र ठरला नाही. टी२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर मात्र, त्याला याची किंमत मोजावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेत त्याल भारतीय संघासाठी खेळण्याची संधी दिली गेली नव्हती.

महत्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियन संघाच्या आनंदावर विरजण! ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर

‘चांगल्या संघात अनेक नेते नसतात’, विराटला हटवून रोहितला वनडे कर्णधार करण्यामागचे कारण गांगुलीकडून उघड

आयडीया! रनआऊट होऊ नये म्हणून डार्सी शॉर्टने केले असे कृत्य की पाहून पोट धरून हसाल – Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---