---Advertisement---

“दोन्ही देशांतील संबंध सुधारल्यास भारतात जाणारा मी पहिला पाकिस्तानी असेल”

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 12:02 AM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय सामन्यांची मालिका खेळलेली नाही. मात्र तसे व्हावे असे दोन्ही देशातील चाहत्यांची इच्छा असेल. क्रिकेटशी संबंधित कामांसाठी अनेक विदेशी खेळाडू भारतात येत असतात. पाकिस्तानी खेळाडूंचा देखील यात समावेश असायचा. मात्र दोन्ही देशातील राजकीय कारणांमुळे पाकिस्तानचे खेळाडू भारतात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या भारतात व्यतीत करण्यात आलेल्या, आपल्या आठवणींना उजाळा दिला. अख्तरने पुन्हा भारतात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण त्याच्या मते त्याला भारतातून खूप प्रेम मिळाले आहे. तसेच अख्तरने बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासोबतच्या देखील आठवणींना उजाळा दिला. शाहरुख आणि सलमान दोघेही त्याची एका लहान भावा सारखी काळजी करत असल्याचे देखील त्याने सांगितले.

स्पोर्ट्सकिडाच्या एका युट्युब चॅनेल सोबत बोलताना अख्तर म्हणाला, “मला मुंबईमध्ये तिथल्या लोकांसोबत बोलायला खूप आवडायचे, सलमान आणि शाहरुखने माझी एका लहान भावा सारखी काळजी घेतली. मी जेव्हाही त्यांच्या आसपास असायचो, तेव्हा त्यांनी माझ्या सुरक्षेची काळजीसुद्धा घेतली होती. मात्र दुर्दैवाने ५ वर्ष झाले, मी भारतात जाऊ शकलो नाही. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा, भारतातले लोक मला तिथले आधार कार्ड आणि रेशन कार्ड बनवण्यासाठी देखील आग्रह धरत होते.”

अख्तरने उभय दोन्ही देशातील संबंध लवकरच सुधारतील अशी आशा देखील केली आहे आणि असे झाले तर तो भारतात येणारा पहिला व्यक्ती बनेल, असेही तो म्हणाला.

याबाबत पुढे बोलताना अख्तर म्हणाला, “भारताविषयी माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मला पुन्हा भारतात जायची संधी मिळावी हीच अपेक्षा करतो. नुकतेच मी माझ्या मित्रांसोबत बोलताना म्हणालो की, लवकरच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील. असे झाले तर भारतात जाणारा मी पहिला पाकिस्तानी असेन. तिथे जाऊन खूप सारे पैसे कमावण्याची देखील मला संधी मिळेल.”

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ साली ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात आली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अजून पर्यंत द्विपक्षीय सामने खेळविण्यात आले नाही. मात्र येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. तसेच दोन्ही संघांचा पहिला सामना एकमेकांविरुद्ध २३ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशातील चाहत्यांना या सामन्याची चांगलीच उत्सुकता लागली असेल.

महत्वाच्या बातम्या –
–‘आमच्या संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे…’, टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य
–तयारी टी२० विश्वचषकाची! बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केली कर्णधार विराट कोहलीसह महत्त्वपूर्ण चर्चा
–“त्यांच्या आई-वडिलांनी देखील असा विचार केला नसेल”, माजी इंग्लिश कर्णधाराने शमी, बुमराहचे केले तोंडभरून कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---