पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने केवळ वयाच्या 28 वर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनावर आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे आणि अशा वातावरणात मी खेळू शकत नाही. त्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याचा बचाव करताना म्हणाला माझ्यासोबत असेच काही 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत झाले होते.
शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “मानसिकरित्या खेळाडूला कमकुवत केले जाते, हे चुकीचे आहे. मी ही गोष्ट उघडपणे बोलू शकतो, माझ्या सोबत ही 2000 साली असे घडले होत. जर कोणाला विश्वास होत नसेल, तर हाफिजला विचारा मिसबाह व इतर सगळे संघात होते. 2011 च्या विश्वचषकातही माझ्या सोबत चांगला व्यवहार केला नव्हता. आफ्रिदीने नाही परंतु व्यवस्थापनाच्या सर्व लोकांनी केले होते.”
अख्तर पुढे म्हणाला, ‘ही गोष्ट मी उघडपणे बोलत आहे, परंतु मला खुप त्रास दिला गेला,अडचणीत आणले .मी तेव्हा याची पर्वा केली नाही कारण मी निवृत्ती घेतली होती. मी त्यांना स्पष्ट केले, हे बघा माझ्याकडे फक्त दोन सामने राहिलेत. जर तुम्हाला खेळवायचे असेल तर ठीक आणि खेळवायचे नसेल तरीही काय अडचण नाही. माझ्याकडे येवढीच 20 षटके राहिलेत. जर मला संधी दिली तर मी भारताविरुद्ध सर्वस्व पणाला लावेल. आमिरने पळण्याचा मार्ग निवडला, त्याने अशी गोलंदाजी करायला हवी होती की संघ व्यवस्थापकांना बाहेर काढता येणार नाही. त्यांच्या समोर उभा राहायला पाहिजे होते, आमिरने त्यांच्याविरुद्ध लढायला हवे होते. जर त्यांनी असे नाही केले तर हे चुकीचे आहे. हा दमदार गोलंदाज आहे,याला माझ्याकडे काही दिवसांसाठी द्या. तुम्हाला हा 150 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करताना दिसेल. या गोलंदाजाला असेच जावू द्यायला नको, हा कामाला येवू शकतो.
मोहम्मद आमिरने अशी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. अनेक आजी-माजी पाकिस्तानी खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भोंगळ आणि मनमानी काराभारावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– श्रीलंकेला विश्वविजेतेपद मिळवून देणारे डेव व्हाटमोर आता भूषविणार या संघाचे प्रशिक्षकपद
– न्यूझीलंड दौऱ्यावरील पाकिस्तानची सुरुवात पराभवाने; पहिल्या टी-२० सामन्यात किवी संघाचा ५ गडी राखून विजय