पाकिस्तानच्या क्रिकेट संघामध्ये एकेकाळी वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर सारखे वेगवान गोलंदाज संघात होते. दोन दशकांपूर्वी पाकिस्तान संघात वेगवान गोलंदाजाची कमतरता नव्हती. परंतु मागील दशकापासून पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये वेगवान गोलंदाजांचा जणूकाही दुष्काळ पडलेला आहे. मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद अमिर या वेगवान गोलंदाज यामुळे पाकिस्तानची उमेद जागी झाली होती. परंतु या दोन्ही खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केली. त्यामुळे त्यांना संघातून बाहेर काढण्यात आले.पाकिस्तान संघात वेगवान गोलंदाजांच्या पडलेल्या दुष्काळावर शोएब अख्तरने भाष्य केले आहे.
“जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देईन”
शोएब अख्तरने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी पाकिस्तानच्या युवा खेळाडूंना वेगाने गोलंदाजी कशी करायची हे शिकवेल. मी सध्या जिमवर लक्ष देत आहेत. परंतु जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी या युवा गोलंदाजांना वेगवान गोलंदाजी कशी करायची हे शिकवेल.” शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४४४ बळी घेतले आहेत. त्याने पुढे सांगितले की, “जर आपण सकारात्मक आणि आपले ध्येय नजरे समोर ठेवले असेल तर आपल्याला ध्येय गाठायला वेळ लागणार नाही. आपली प्रत्येक पावले आपल्या ध्येयाच्या दिशेने असतील तर आपण नक्कीच ध्येय गाठू शकतो.” शोएब अख्तर पुढे म्हणाला की, जेव्हा तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन होईल. तेव्हा संघात वेगवान गोलंदाजांची कमी कमतरता पडू देणार नाही.
पाकिस्तान संघात सध्या शाहीन अफरीदी, नसीम शाह, हरीस रऊफ आणि मोहम्मद हसनैन सारखे वेगवान गोलंदाज आहेत. हे सर्व खेळाडू 140 किमी प्रतितास पेक्षाही जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतात आणि या खेळाडूंनी या अगोदरही या वेगाने गोलंदाजी केली आहे. परंतु हे सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहेत. परंतु महत्वाची बाब ही आहे, असा कोणी युवा खेळाडू पाकिस्तानमध्ये येईल का जो शोएब अख्तर सारखी वेगाने गोलंदाजी करेल. शोएब अख्तर जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत होता, तेव्हा तो 161.3 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता. परंतु शोएब अख्तरचा हा विक्रम आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने मोडलेला नाही. आता येत्या काळात पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड दुसरा शोएब अख्तर निर्माण करू शकणार का, हा कळीचा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या:
टेस्ट कॅप नं. २८१! ऐतिहासिक लॉर्डसवर न्यूझीलंडसाठी या आफ्रिकन फलंदाजाने केले पदार्पण
लॉर्डस कसोटीत उतरताच जेम्स अँडरसनच्या नावे झाला हा खास विक्रम
कोहली नव्हे तर या भारतीय फलंदाजाला गोलंदाजी करणे सर्वात कठीण, पाकिस्तानी गोलंदाजाचे मत