पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या कारकिर्दीतील त्या आठवणींना उजाळा दिला आहे, जेव्हा त्याने गॅरी कर्स्टनवर आपली छाप पाडली होती. १९९४ मध्ये तिरंगी वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. त्यावेळी नेट्समधील सराव सत्रादरम्यान अख्तरला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी आपल्या गोलंदाजीने अख्तरने सर्वांना चकित केले होते. Shoaib Aktar Reminds Nets Incident With Gary Kirsten
रावळपिंडी एक्सप्रेस अख्तरने सांगितले की, “नेट्समध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनने त्याचा सामना केल्यानंतर त्याला युवा गोलंदाज अख्तरला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात खेळताना पाहायचे होते. त्यावेळी मी शानदार फॉर्ममध्ये होतो आणि अशावेळी मला पाकिस्तानकडून खेळायची संधी मिळाली नसती तर माझा फॉर्म वाया गेला असता.” या घटनेच्या ३ वर्षांनंतर अर्थात १९९७ला अख्तरला पाकिस्तान कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
“मी दक्षिण आफ्रिका संघासाठी नेट गोलंदाज बनलो होतो. मला आठवत आहे की, गॅरी कर्स्टन आणि जोंटी रोड्स माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले होते की, तु आमच्याविरुद्ध एक चांगला नेट वेगवान गोलंदाज बनशील का? यावर मी त्यांना म्हणालो होतो की, हो सर, मी हे करू शकतो. काही दिवसांनंतर मी तुमच्याविरुद्ध खेळताना दिसेल. तुम्ही माझा सामना करु शकाल ना,” असे टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्टशी बोलताना अख्तर म्हणाला.
“मी नेट्समध्ये सराव करताना कर्स्टनला १-२ चेंडू टाकले आणि तो म्हणाला, ओह माय लॉर्ड. तु नेट्समध्ये नाही तर राष्ट्रीय संघात असायला पाहिजे. यावर मी त्याला प्रश्न केला की, मी एक महान गोलंदाज बनण्याच्या लायक आहे का? हे ऐकून कर्स्टन मला म्हणाला की, तू मजा करत आहेस का. मी पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन तुझ्यासाठी शिफारस करेन. तू खेळायला तयार आहेस का? पण, पाकिस्तानने मला त्या घटनेच्या ४ वर्षांनंतर संधी दिली आणि माझा महत्त्वाचा वेळ वाया गेला,” असे पुढे बोलताना अख्तर म्हणाला.
असे असले तरी, १९९७ला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारा अख्तर हा जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांच्या यादीत सामील झाला. त्याने कसोटीत ४६ सामने खेळत १७८ विकेट्स घेतल्या. तर १६३ वनडे सामन्यात २४७ विकेट्स आणि १५ टी२० सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ धोनीने सांगितल्यामुळे ‘या’ क्रिकेटरने खेळला होता २०११ सालचा विश्वचषक
कित्येक भारतीय क्रिकेटर्सची कारकिर्द घडवणारा मुंबईकर काळाच्या पडद्याआड
ट्रेंडिंग लेख –
भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश
आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी