---Advertisement---

फलंदाज त्रिफळाचीत होऊनही पंचांनी दिले नाबाद, क्रिकेटच्या नियमामुळे प्रतिस्पर्धी संघाची गोची!

On: शनिवार, सप्टेंबर 28, 2024 10:01 PM
Shoaib bashir wicket
---Advertisement---

क्रिकेटमध्ये प्रतिभेबरोबरच नशिबालाही खूप महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये अनेक वेळा अशा घटना घडतात ज्या आश्चर्यापेक्षा कमी नसतात. असेच काहीसे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्येही पाहायला मिळाले आहे. समरसेट आणि हॅम्पशायर यांच्यात झालेल्या सामन्यात एक फलंदाज त्रिफळाचीत झाला पण त्याला बाद देण्यात आले नाही. नेमके काय घडले?, समजून घेऊया…

26 सप्टेंबर रोजी समरसेटच्या खेळीदरम्यान ही आश्चर्यकारक घटना दिसली. संघाच्या 9 विकेट पडल्या होत्या. आता इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीर क्रीझवर फलंदाजीला आला होता. यावेळी गोलंदाजी करत असलेल्या काइल ॲबॉटने पहिल्याच चेंडूवर बशीरच्या बत्त्या गुल केल्या. विकेट मिळाल्याने हॅम्पशायरच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली, मात्र यादरम्यान फलंदाज पव्हेलियनला न परतता मैदानावरच उभा राहिला.

पंचांनी बाद दिले नाही
शोएब बशीरने हॅम्पशायरविरुद्ध नॉन-स्ट्राइक एंडकडे बोट दाखवले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. यावर पंचांनी गोलंदाजाला सांगितले की, चेंडू फेकताना त्याचा टॉवेल पडला होता, ज्यामुळे फलंदाजाचे लक्ष विचलित झाले. अशा स्थितीत चेंडूला डेड बॉल घोषित करण्यात आले.

नियम काय म्हणतो
एसीसी क्रिकेटच्या 20.4.2.6 नुसार, स्ट्राईकवर उभ्या असलेल्या फलंदाजाला चेंडूचा सामना करताना, त्याचे लक्ष विचलित करणाऱ्या कोणत्याही आवाजाने किंवा अशा कोणत्याही हालचालीचा सामना करावा लागला, तर पंच तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतो. या नियमामुळे शोएब बशीरची विकेट वाचली.

दरम्यान या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, हॅम्पशायर संघाने 5 विकेट्सने हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना समरसेट संघ 136 धावांवरच सर्वबाद झाला होता. या डावात कायल अबॉट आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात पहिल्या डावात हॅम्पशायरने केवळ 60 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही समरसेटचा संघ 180 धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे हॅम्पशायने सहज सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

5 क्रिकेटपटू ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, नंतर फलंदाजीत कमावलं नाव
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत केन विल्यमसनच्या नावे नकोसा विक्रम! काय घडलं जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---