पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याने टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे. टी20 मध्ये 13 हजार धावा करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. आशिया खंडात ही कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान शोएब मलिकने हा विक्रम केला आहे.
शोएब मलिक हा बांगलादेश प्रीमियर लीगमधील फॉर्च्युन बरीशाल संघाचा भाग आहे. या संघाकडून खेळताना त्याने शनिवारी (20 जानेवारी) रंगपूर रायडर्सविरुद्ध नाबाद 17 धावा केल्या आणि यासह त्याने आपले नाव या रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. (shoaib malik completes 13000 run in t20 cricket)
शोएब मलिकने आता टी20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने आपल्या 526 व्या सामन्यात ही कामगिरी केली. आता त्याच्या एकूण 13010 धावा झाल्या आहेत. तो 2005 पासून टी-20 क्रिकेट खेळत आहे. या कालावधीत त्याने 36.44 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2005 ते 2022 दरम्यान 463 सामन्यात 14562 धावा केल्या. या काळात त्याने 22 शतके आणि 88 अर्धशतके झळकावली आहेत.
या यादीत भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये 376 सामन्यांमध्ये 11994 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 8 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत. आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली 12 हजार धावांचा आकडा गाठेल. भारतीय संघाचा आणखी एक फलंदाज रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 426 सामन्यात 11156 धावा केल्या आहेत. रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी झाली आहे. अलीकडेच त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शतकही झळकावले आहे. (Shoaib Malik’s big record in T20 no Asian batsman has been able to do that till date)
हेही वाचा
‘भारताकडे ‘विराटबॉल’ आहे…’, भारतीय दिग्गजाचा कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा इशारा
IND vs ENG: जडेजा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही, पीटरसनने भारतीय फिरकीपटूचा सामना करण्यासाठी इंग्लंडला दिला मंत्र