---Advertisement---

मॅचच्या आधी ७ तास पाकिस्तानचे खेळाडू करत होते पार्टी, व्हिडिओ झाला व्हायरल

On: सोमवार, जून 17, 2019 3:04 PM
---Advertisement---

मँचेस्टर। रविवारी(16 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तान संघाला या पराभवामुळे चाहत्यांच्या रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.

त्यातच या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक पहिलाच चेंडू खेळताना हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर शून्य धावेवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे त्याच्यावरही चाहत्याकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच नुकताच त्याचा आणि त्याच्या संघसहकाऱ्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की शोएब मलिकसह वहाब रियाज, इमाम उल हक हे पाकिस्तानचे क्रिकेटपटू एका हॉटेलमध्ये पार्टी करत आहेत. तसेच यावेळी त्यांच्याबरोबर भारताची स्टार महिला टेनिसपटू आणि मलिकची पत्नी सानिया मिर्झा देखील आहे.

हा व्हिडिओ ज्या ट्विटर हँडेलवरुन शेअर करण्यात आला आहे, त्यामध्ये सांगण्यात आले आहे की हा व्हिडिओ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या आदल्या रात्रीचा असून पार्टीची वेळ मध्यरात्रीची आहे.

चाहत्यांनी या व्हिडिओचा आधार घेत पाकिस्तान संघाला तसेच शोएब मलिकला ट्रोल केले आहे. तसेच त्यांच्या कामगिरीचा संबंध या पार्टिशीही काही चाहत्यांनी जोडताना सामना गंभीरतेने न घेण्याचा आरोप केला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द सानिया मिर्झाने या व्हिडिओबद्दल ट्विट केले आहे. तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘हा व्हिडिओ आम्हाला न विचारता शूट करण्यात आला आहे. हा आमच्या प्रायव्हसीचा (वैयक्तिक स्वातंत्र्य) अनादर आहे. आमच्याबरोबर लहान मुलगाही आहे.आम्ही जेवण करत होतो आणि सामना हरल्यानंतरही लोकांना खाण्या-पिण्याचे स्वातंत्र्य आहे. पुढच्यावेळी चांगले कंटेंट लिहा.’

https://twitter.com/MirzaSania/status/1139950267619692544

असे असले अनेकांनी हा व्हिडिओ जूना असल्याचे म्हटले आहे, जो व्हिडिओ पाकिस्तान हरल्यानंतर उपयोगात आणला जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे आणि कुठला आहे याबद्दल अजूनतरी कोणतीही माहिती नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टॉप १०: पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकी खेळीबरोबच किंग कोहलीने केले हे १० खास पराक्रम

विराट कोहली, एमएस धोनी झाले दस नंबरी…

टॉप १०: भारत-पाकिस्तान सामन्यात झाले हे खास १० विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment