शोयब मलिकने बुधवारी आपण २०१९ विश्वचषकात निवृत्ती घेणार असल्याचे घोषीत केले आहे. परंतु आपण आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात मात्र खेळत रहाणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
या खेळाडूने २०२०ला आॅस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
शोयब मलिक ९५ आंतरराष्ट्रीय सामने खेळला असुन केवळ शाहिद आफ्रिदी (९८) त्यापेक्षा जास्त सामने खेळला आहे.
” २०१९चा विश्वचषक हा माझा शेवटचा विश्वचषक असणार आहे. परंतु मला २०२०चा टी२० विश्वचषक खेळायचा आहे. हेच माझे टी२०मधील लक्ष असणार आहे. ” असे तो म्हणाला.
“सध्या माझ्यासमोर हेच लक्ष आहे. माझ्या कामगिरीत सातत्य राहिले तर मी नक्की हे दोन विश्वचषक खेळणार आहे. ” असेही तो पुढे म्हणाला.
मलिकने १४ ऑक्टोबर १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०००पुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा आणि सध्या खेळत असलेला तो केवळ ६वा खेळाडू आहे.
२००० पुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारे आणि सध्या खेळत असलेले खेळाडू
हरभजन सिंग- २५ मार्च १९९८
ख्रिस गेल- ११ सप्टेंबर १९९९
रंगाना हेराथ- २२ सप्टेंबर १९९९
युवराज सिंग- ०३ ऑक्टोबर २०००
शोएब मालिक -१४ ऑक्टोबर १९९९
मार्लन सॅम्युएल- ०४ ऑक्टोबर २०००@MarathiBrain @MarathiRT #म #मराठी— Sharad Bodage (@SharadBodage) May 10, 2018
दिवसातील महत्त्वाच्या बातम्या-
–रोहितचा असाही एक विक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही
–सगळे प्रयत्न करुन झाले पण केकेआरवर राज्य तर रोहित शर्माची मुंबईच करते!