पाकिस्तान क्रिकेट संघ हा मैदानावरील आपल्या गचाळ क्षेत्ररक्षणासाठी संपूर्ण क्रिकेटविश्वात कुप्रसिद्ध आहे. अनेक वेळा पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे त्यांचा संघ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात ट्रोल होत असतो. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेटचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पाकिस्तानी खेळाडूने क्षेत्ररक्षणात चौकार वाचण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चुकीमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चक्क 5 धावा पळून काढल्या.
पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया संघादरम्यान कार्डीफ येथे नेटवेस्ट मालिकेतील हा सामना 9 जून 2001 रोजी झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्यांच्या डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर गोलंदाजीसाठी आला होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्क वॉने चेंडू सीमारेषेकडे फटकवला.
मैदान मोठे असल्यामुळे चेंडू सीमारेषेकडे जातांना त्याची गती कमी होत होती, याचाच फायदा घेत पाकिस्तानी क्षेत्ररक्षक शोएब मलिकने प्रयत्नांची शर्थ करत चेंडू सीमारेषेजवळ आडवला. मात्र या सर्व प्रक्रियेत शोएबला भरपूर वेळ लागल्यामुळे तोपर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चक्क 5 धावा पळून काढल्या.
विशेष म्हणजे जर मलिकने चेंडू आडवला नसता, तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना केवळ 4 धावा मिळाल्या असत्या. सध्या हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी शोएब मलिक व पाकिस्तान संघाला ट्रोल केले आहे.
https://twitter.com/CrapCric/status/1396393161627521024
दरम्यान, या सामन्याचा विचार केला असता, येथे ऑस्ट्रेलियान संघाने सहज पाकिस्तानचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्ताने सर्वबाद 257 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने रिकी पॉंटिंगच्या आक्रमक 70 धावांच्या खेळीमुळे आणि मायकल बेवन व तात्कालिन कर्णधार स्टीव्ह वॉच्या अर्धशतकांच्या जोरावर 258 धावांचे लक्ष केवळ 3 गडी गमावत सहज रित्या पूर्ण केले. रिकी पॉंटिंगला आपल्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आशिया कप पुन्हा झाला स्थगित, आता ‘या’ साली होणार स्पर्धा
या ५ भारतीय क्रिकेटपटूंनी केले आहे चित्रपटांमध्ये काम; एका विश्वचषकविजेत्या कर्णधाराचाही समावेश





