BBL match Abandoned due to Unsafe Pitch: ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी20 स्पर्धा बिग बॅश लीग 2023 स्पर्धेला 7 डिसेंबरपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिले तीन सामने व्यवस्थित पार पडले. मात्र, चौथ्या सामन्यातून हैराण करणारी बातमी समोर येत आहे. या सामन्यासाठी वापरलेली खेळपट्टी धोकादायक असल्याचे सांगत सामना रद्द करण्यात आला आहे. अशात या खेळपट्टीवरून जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.
खरं तर, बीबीएल 2023 (BBL 2023) स्पर्धेतील चौथ्या सामन्यात रविवारी (दि. 10 डिसेंबर) मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध पर्थ स्कॉर्चर्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात आधी पावसाने एन्ट्री केली. त्यानंतर खेळपट्टीने उरलेली कसर पूर्ण केली. खेळपट्टीत खतरनाक उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे फलंदाजानी खेळण्यास नकार दिला.
Hear from Aaron Finch on the @FoxCricket mic as the umpires have a chat about the pitch in Geelong…#BBL13 pic.twitter.com/PsHbPQZZaL
— KFC Big Bash League (@BBL) December 10, 2023
यावेळी चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर, जी उसळी पाहायला मिळाली, त्याने यष्टीरक्षण करत असलेला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याच्याही भुवया उंचावल्या. यानंतर पंचांनी धोकादायक खेळपट्टीमुळे (Unsafe Pitch) सामना रद्द केला.
फक्त 6.5 षटकांचा खेळला गेला सामना
या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी करताना पूर्ण 7 षटकांचा खेळही खेळला नाही. त्यांनी 6.5 षटकात 2 विकेट्स गमावत 32 धावा केल्या. यावेळी ऍरॉन हार्डी याने सर्वाधिक नाबाद 20 धावा, तर जोश इंग्लिसने नाबाद 3 धावा केल्या. तसेच, कूपर कॉनोली 6 धावांवर बाद झाला.
यावेळी मेलबर्नकडून गोलंदाजी करताना टॉम रॉजर्स आणि विल सदरलँड यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (shocking big bash match 4th match between melbourne renegades vs perth scorcher has been suspended due to uneven bounce video viral)
हेही वाचा-
INDvsSA: पहिल्या टी20त कोण करणार Opening? कॅप्टन सूर्या म्हणाला, ‘निर्णय तर कधीच झालाय…’
विजय मिळवूनही निराश झाला कीवी कर्णधार; म्हणाला, ‘माझ्या करिअरमधली सर्वात खराब…’