---Advertisement---

ब्रेकिंग! विश्वचषकात खेळलेल्या दिग्गज खेळाडूचे निधन

On: शुक्रवार, जानेवारी 6, 2023 10:16 PM
Breaking
---Advertisement---

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्यानंतर आता फुटबॉल चाहत्यांना आणखी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. विश्वचषक खेळणाऱ्या इटलीचा माजी फुटबॉलपटू जियानलुका वियाली याचे निधन झाले आहे. तो 58 वर्षांचा होता. त्याच्या निधनाने फुटबॉल विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. सध्या फुटबॉल विश्व दु:खात आहे. वियाली याला सन 2017मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. कर्करोगामुळेच त्याचे निधन झाले आहे. त्याच्या फुटबॉल कारकीर्दीत त्याने अनेक मोठ्या विक्रमांवर नाव कोरले होते.

शुक्रवारी झाले निधन
इटलीच्या फुटबॉल महासंघाने शुक्रवारी (दि. 06 जानेवारी) जियानलुका वियाली (Gianluca Vialli) याच्या निधनाचे वृत्त दिले आहे. वियाली याच्या निधनाची बातमी मिळताच सोशल मीडियावर फुटबॉलप्रेमी दु:ख व्यक्त करत आहेत. चाहते सोशल मीडियावर आपल्या आवडत्या फुटबॉलपटूला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. वियाली याने त्याच्या कारकीर्दीत इटलीच्या राष्ट्रीय संघाकडून एकूण 59 सामने खेळले होते. यामध्ये दोन फीफा विश्वचषकाचाही समावेश होता. त्याने 1986 आणि 1990 फीफा विश्वचषकात इटलीचे प्रतिनिधित्व केले होते.

दीर्घ काळापासून देत होता आजाराशी झुंज
सन 2017मध्ये पहिल्यांदा त्याला पेनक्रियाज कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र, एक वर्ष उपचारानंतर तो काही प्रमाणात बरादेखील झाला होता. मात्र, सन 2021मध्ये पुन्हा एकदा या जीवघेण्या आजाराने त्याला ग्रासले. एक वर्ष त्याने या आजाराशी झुंज दिली. मात्र, तो ही लढाई हारला. 6 जानेवारी, 2023 रोजी त्याने या जगाचा निरोप घेतला

इटलीसाठी केले होते एकूण 16 गोल
सन 1985 ते 1992 पर्यंत इटलीच्या संघाकडून खेळताना जियानलुका वियालीने एकूण 16 गोल केले होते. काही दिवसांपूर्वी वियालीने राष्ट्रीय संघाच्या प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुखाची भूमिका बजावत होते. मात्र, आपल्या आजारपणामुळे एका महिन्यापूर्वी त्याने संघाची साथ सोडली होती. शरीरात कमजोरी आल्यामुळे त्याने विश्रांती घेतली होती. त्याने चेल्सी येथे खेळाडू आणि व्यवस्थापकाची भूमिका निभावण्यापूर्वी सॅम्पडोरिया आणि जुव्हेंटस या दोन्ही संघांना सेरी ए आणि युरोपियन ट्रॉफी जिंकण्यास मदत केली होती. फुटबॉल जगतात तो कायम स्मरणात राहील. (shocking former italian national football gianluca vialli dies at 58 of cancer read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोनाल्डो वर्षाकाठी कमावणार 1800 कोटी, भारताच्या सर्वात महागड्या खेळाडूला हा आकडा गाठायला लागतील 150 वर्षे
डॅनी डॅनियल्सनेही घेतली पाकिस्तान संघाची फिरकी, समालोचकांकडून झाली मोठी चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---