---Advertisement---

काळीज तोडणारी बातमी! दिग्गज अष्टपैलू हरपला, वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

On: बुधवार, ऑगस्ट 23, 2023 7:30 AM
Breaking
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू हीथ स्ट्रीक याचे निधन झाले आहे. त्याने 22 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. हीथ स्ट्रीक 49 वर्षांचा होता. तो मागील काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होता. स्ट्रीकच्या निधनाने झिम्बाब्वेसोबतच क्रिकेटविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या निधनावर चाहत्यांसोबतच क्रिकेटपटूही शोक व्यक्त करत आहेत.

खेळाडू भावूक
हीथ स्ट्रीक (Heath Streak) याच्या निधनावर आजी-माजी क्रिकेटपटू ट्वीट करून शोक व्यक्त करत आहेत. भारतीय संघाचा अष्टपैलू आर अश्विन (R Ashwin) यानेही दु:ख व्यक्त केले आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “हीथ स्ट्रीक आपल्यात नाही. दु:खद! खूपच दु:खद. आरआयपी.”

https://twitter.com/ashwinravi99/status/1694162453821825310?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1694162453821825310%7Ctwgr%5E2c33edb29bce630f8a03f1ff81afdf1a80191afa%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fformer-zimbabwe-captain-heath-streak-has-passed-away-aged-49-battle-with-cancer-2479341

https://twitter.com/sean14williams/status/1694106532948922586?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1694106532948922586%7Ctwgr%5E2c33edb29bce630f8a03f1ff81afdf1a80191afa%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fformer-zimbabwe-captain-heath-streak-has-passed-away-aged-49-battle-with-cancer-2479341

https://twitter.com/henryolonga/status/1694094487776305536?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1694094487776305536%7Ctwgr%5E2c33edb29bce630f8a03f1ff81afdf1a80191afa%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fformer-zimbabwe-captain-heath-streak-has-passed-away-aged-49-battle-with-cancer-2479341

हीथ स्ट्रीक याने झिम्बाब्वे क्रिकेट संंघाकडून 65 कसोटी सामने आणि 189 वनडे सामने खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून खेळणाऱ्या स्ट्रीकच्या नावावर कसोटीत एकूण 216 विकेट्सची नोंद आहे. यादरम्यान त्याने एका डावात 16 वेळा 4 विकेट्स, तर 7 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच, वनडे क्रिकेटमध्येही हीथ स्ट्रीकने गोलंदाजीतून चांगली कामगिरी केली होती.

हीथ स्ट्रीकने वनडे क्रिकेटमध्ये 29.82च्या सरासरीने आणि 4.51च्या इकॉनॉमी रेटने 239 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 वेळा एका डावात 4 विकेट्स, तर एक वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त त्याने बॅटमधूनही आपला दम दाखवून दिला होता. कसोटीत त्याच्या नावावर 1990 धावा, तर वनडेत 2943 धावांची नोंद आहे. स्ट्रीकने कसोटीत 1 शतक आणि 11 अर्धशतके ठोकली. तसेच, वनडेत त्याने 13 अर्धशतके कुटली होती.

नेतृत्वाची आकडेवारी
सन 2000मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने हीथ स्ट्रीक याच्याकडे कसोटी आणि वनडे संघांच्या नेतृत्वाची धुरा सोपवली होती. स्ट्रीकच्या नेतृत्वात झिम्बाब्वेने 21 कसोटी सामन्यात 4 विजय मिळवला, तर 11 सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, 6 सामने अनिर्णित राहिले. वनडेत स्ट्रीकने 68 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि यात 47 सामन्यात पराभव पत्करावा लागला. संंघाने फक्त 18 सामनेच जिंकले. (shocking former zimbabwe captain heath streak has passed away aged 49 battle with cancer)

हेही वाचा-
“विराट स्वतःला भारी बॉलर समजतो, पण…” भुवीने सांगितला टीम इंडियातील तो किस्सा
पाकिस्तानी गोलंदाजांपुढे अफगाणी फलंदाज ढेर! 202 धावांचा पाठलाग करताना 142 धावांनी लाजिरवाणा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---