दररोज ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या येत असतात. यामध्ये अधिकतर सामान्य लोक सायबर फसवणुकीत अडकून कमावलेला सर्व पैसा गमावून बसतात. ऑनलाईन फसवणूक कधी आणि कुणासोबत होईल, याचा काहीही नेम नसतो. याला अनेक मोठमोठ्या संस्थाही बळी पडताना दिसत आहेत. आता ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी जागतिक क्रिकेटचं काम पाहणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरच निशाणा साधला आहे. त्यांनी आयसीसीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
मात्र, आयसीसीने त्यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल कोणतेही भाष्य केले नाहीये. असे असले, तरीही क्रिकेटविषयी माहिती देणाऱ्या एका वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आयसीसीने या घटनेविषयी तपास सुरू केला आहे. फिशिंगच्या या घटनेने आयसीसीमध्ये खळबळ माजवली आहे.
कशी झाली आयसीसीची फसवणूक?
फसवणूक करणाऱ्याने अमेरिकेत आयसीसीच्या सल्लागाराच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केला. यामार्फत आयसीसीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याला 20 कोटी रुपयांहून अधिकचे बिल पाठवून त्यांना ते भरण्यास सांगितले. अशात मुख्य वित्त ऑफिस गोंधळात पडला आणि बिल भरून टाकले. मात्र, आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, वित्त अधिकारी ऑफिसमध्ये कुणीही बँक अकाऊंट नंबरवर लक्ष का दिले नाही. असे असूनही आयसीसी अद्याप यावर मौन बाळगून आहे, परंतु त्यांनी याविषयी तपास सुरू केला आहे. तसेच, अमेरिकेतील कायदेशीर संस्थांकडेही तक्रार केली आहे.
क्रीडा पत्रकारानेही दिली माहिती
दुसरीकडे, वरिष्ठ पत्रकार श्रीनिवास राव यांनीही ट्विटरमार्फत या फसवणुकीविषयी माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “आयसीसीसोबत एक जामताडा झाले आहे.” त्यांनी पुढे लिहिले आहे की, “ज्यांना जामताडा माहिती नाही, त्यांना सांगतो की, जामताडा नेटफ्लिक्सवरील एक शानदार सीरिज आहे, जी फिशिंगच्या धोक्याबद्दल सांगते.”
A "Jamtara" has happened with the International Cricket Council (ICC). 🤦🏾
For those who can't get the reference, "Jamtara" is an exceptionally good series on Netflix that deals with the "phishing" menace.
You must watch it, if you haven't already. : )
Anyways … 👇🏾
+
— KSR (@KShriniwasRao) January 19, 2023
त्याने पुढे लिहिले की, “आयसीसीसोबत ऑनलाईन फसवणूक होण्याची ही पहिली वेळ नाहीये. फसवणुकीची ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. आता म्हटले जात आहे की, एफबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.”
Apparently this was done so neatly that the payment got cleared.
Scary!
And apparently, this is not the first time the ICC has suffered this. 3rd or 4th instance probably or more.
The total loss so far is to the tune of US$2m already.
Someone said FBI is investigating.
##
— KSR (@KShriniwasRao) January 19, 2023
आयसीसीसारख्या बोर्डासोबत हा प्रकार घडणे धक्कादायक आहे. आता आयसीसी या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच, या प्रकरणात काय निष्पन्न होते, हे जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. (shocking icc becomes a victim of online fraud 20 crore lost in phishing attack)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जास्तीत जास्त टी10 लीग खेळवा”, भारताच्या जगज्जेत्या खेळाडूंनी केली मागणी
आपल्याच मुलींमुळे वैतागला डेविड वॉर्नर! इच्छा नसतानाही करायला लावत आहेत डान्स