कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने होते. उभय संघात आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील चौथा सामना खेळला गेला. हा सामना भारतीय संघाने 41 धावांनी जिंकला. यासह भारताने स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवले. मात्र, सामन्यानंतर दोन्ही देशांचे चाहते स्टेडिअममध्ये भांडताना दिसले. आता यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत क्रिकेट चाहते आपसात भांडताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओत श्रीलंकेची जर्सी परिधान केलेला एक चाहता एका व्यक्तीच्या दिशेने धावताना दिसत आहे. तसेच, काही प्रेक्षक कुठल्यातरी व्यक्तीला बुक्क्यांचा प्रसाद देताना दिसत आहेत. व्हिडिओत पुढे व्यक्तींचा एक गट इतर लोकांना चेतावणी देताना दिसत आहे. एकाने गळा दाबल्याचेही एका व्हिडिओत दिसते. तसेच, त्यांना स्टेडिअम सोडण्याचा ईशाराही करताना दिसत आहे.
Fans fight in the stadium after #INDvsSL game in #AsiaCup2023 #DunithWellalage #kuldeepyadav pic.twitter.com/XKhY2DaDH3
— Rishabh Beniwal (@RishabhBeniwal) September 12, 2023
सामन्याचा आढावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव 213 धावांवर संपुष्टात आला होता. यावेळी भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सर्वाधिक 53 धावांचे योगदान दिले. यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना दुनिथ वेललागे याने सर्वोत्तम गोलंदाजी करत 10 षटकात 40 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याने रोहित, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांची विकेट घेतली. त्याच्याव्यतिरिक्त चरिथ असलंका यानेही 4 विकेट्स घेतल्या, तर महीश थीक्षणा याला एक विकेट घेता आली.
भारताच्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतानाही दुनिथच चमकला. त्याने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. तसेच, धनंजय डी सिल्वा यानेही 41 धावांचे योगदान दिले. यावेळी भारताकडून कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी केली. कुलदीपने 9.3 षटके गोलंदाजी करताना 43 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या यांनीही 1 विकेट नावावर केली. (shocking ind vs sl game in asia cup 2023 fans fight in the stadium after india and sri lanka match see video)
हेही वाचा-
‘विराट आणि रोहितसारख्या खेळाडूंना वयामुळे टी20 संघाबाहेर करणे धोकादायक’, इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे भाष्य
‘हा विजय माझ्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा…’, श्रीलंकेच्या नांग्या ठेचल्यानंतर असे का म्हणाला गंभीर?